नवी दिल्ली: जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेट बोर्ड असलेल्या भारतीय क्रिकेट नियामक मंडळ अर्थात बीसीसीआयने काही दिवसांपूर्वी आयपीएलची घोषणा केली. यामुळे क्रिकेटपटू आणि चाहत्याना उत्साह आणि आनंद झाला. पण भारतीय क्रिकेट संघाकडून खेळणाऱ्या या क्रिकेटपटूंना गेल्या १० महिन्यांपासून पगार दिला गेला नाही. सोबत केंद्रीय करार करणाऱ्या २७ खेळाडूंना गेल्या ऑक्टोबर महिन्यांपासून पगारच दिला गेला नाही. या खेळाडूंना तिमाही रक्कम आणि मॅच फी अद्याप मिळाली नाही. वाचा- भारतीय क्रिकेट नियामक मंडळ हे खेळाडूंशी करार करते. या करारात खेळाडूंना त्यांच्या ग्रेडनुसार पगार दिला जातो. खेळाडूंना वर्ष भरा चार वेळा म्हणजे प्रत्येक तिमाहीत पगार मिळतो. भारतीय खेळाडूंना अखेरची रक्कम ऑक्टोबर महिन्यात देण्यात आली होती. या शिवाय खेळाडूंना मॅच फी देखील दिली गेली नाही. डिसेंबर २०१९ नंतर भारतीय क्रिकेट संघाने २ कसोटी, ९ वनडे आणि ८ टी-२० सामने खेळले आहेत. पण बोर्डाने अद्याप याचे पैसे दिले नाहीत. इंडियन एक्स्प्रेसने दिलेल्या माहितीनुसार बोर्डाला ज्या खेळाडूंचे पैसे द्यायचे आहेत त्याची एकूण रक्कम ९९ कोटी इतकी झाली आहे. आता ही रक्कम खेळाडूंना त्यांच्या ग्रेडनुसार वाटायची आहे. ग्रेट ए प्लसमध्ये कर्णधार , रोहित शर्मा आणि जसप्रीत बुमराह यांना ७ कोटी, ग्रेड ए, बी आणि सी मधील खेळाडूंना अनुक्रमे ५ कोटी, ३ कोटी आणि १ कोटी दिले जातात. मॅच फीचा विचार केल्यास कसोटीत १५ लाख वनडे ६ लाख आणि टी-२० साठी ३ लाख इतकी रक्कम मिळते. वाचा- बीसीसीआयने त्यांची बॅलेन्स शीट सार्वजनिक केली आहे. त्यानुसार मार्च २०१८ पर्यंत त्यांच्या बँक खात्यात ५ हजार ५२६ कोटी रुपये होते. ज्यातील २ हजार २९२ कोटी एफडीचा समावेश आहे. या शिवाय एप्रिल २०१८ मध्ये बोर्डने स्टार टीव्ही सोबत ६ हजार १३८.१ कोटीचा करार ५ वर्षासाठी केला होता. या रिपोर्टनुसार केंद्रीय करारातील ८ खेळाडूंनी या गोष्टीला दुजोरा दिला आहे की त्यांना गेल्या १० महिन्यांपासून पगार मिळाला नाही. बीसीसीआयचे कोषाध्यक्ष अरुण धुमल यांनी यावर कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. तर बोर्डाशी संबंधिक एका सूत्राने यासाठी बोर्डात सुरू असलेल्या अनिश्चिततेचे कारण असल्याचे सांगितले. वाचा- बोर्डाकडे डिसेंबरनंतर मुख्य वित्त अधिकारी नाही. त्याच बरोबर गेल्या महिन्यापासून मुख्य कार्यकारी अधिकारी आणि क्रिकेट ऑपरेशन्स ही पद रिक्त आहेत. बोर्डाच्या घटनेनुसार अध्यक्ष आणि सचिव जय शहा यांचा कार्यकाळ आता संपणार आहे. बीसीसीआयने सर्वोच्च न्यायालयाला कुलिंग ऑफ पिरियड रद्द करण्यासाठी याचिका दाखल केली आहे. जेणेकरून हे दोघे पदावर कायम राहतील.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3gk8luw
No comments:
Post a Comment