नवी दिल्ली: बहुप्रतिक्षित IPLच्या १३व्या हंगामाच्या तारखा जाहिर झाल्या आहेत. १९ सप्टेंबरपासून युएईमध्ये आयपीएलची सुरूवात होणार असून आठ नोव्हेंबर रोजी फायनल मॅच होईल. आयपीएलच्या नियोजनासंदर्भात पुढील आठवड्यात बैठक होणार असून यात स्पर्धेचे अंतिम स्वरुप निश्चित केले जाणार आहे. सुरू होणार असल्यामुळे क्रिकेटपटू आणि चाहते यांना प्रचंड आनंद झाला असला तरी IPLच्या आयोजनाची वाट इतकी सोपी नाही. वाचा- युएईमध्ये होणाऱ्या IPLच्या आयोजनात बीसीसीआयला सर्वात मोठी अडचण येणार आहे ती लॉजिस्टिक संदर्भात. सर्व खेळाडूंना एकत्र आणण्यासाठी कमीत कमी ३ आठवडे लाणार आहेत. जर सर्व काही ठीक झाले तर स्पर्धेतील सर्व संघ ऑगस्टच्या मध्यापर्यंत युएईमध्ये पोहोचतील. अधिकतर खेळाडू गेल्या ६ महिन्यापासून क्रिकेट खेळले नाहीत आणि आयपीएलच्या तयारीसाठी त्यांच्याकडे अतिशय कमी वेळ असेल. वाचा- यामुळे होणार सर्वात मोठी अडचण या स्पर्धेसाठी भारतातून १ हजार २०० हवाई उड्डाणाची मंजूरी घ्यावी लागणार. २०० क्रिकेटपटू, मॅचसाठीचे अधिकारी, अंपायर आणि अन्य अधिकारी मिळून ४०० ते ५०० जण असतील ज्यांना युएईमध्ये घेऊन जावे लागेल. अशा परिस्थितीत फक्त भारत आणि युएई सरकारची परवानगी नाही तर परदेशी क्रिकेटपटू, अंपायर आणि सामना अधिकाऱ्यांच्या देशाची मंजूरी लागेल. सर्वांना एका ठिकाणी गोळा करणे आणि मग युएईला घेऊन जाणे. हे सर्व नियोजन कसे केले जाईल, हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे. वाचा- आयपीएल २००९ आणि २०१४चा काही भाग देशातून बाहेर झाला होता. क्रिकेटच्या इतिहासा असे कधीच झाले नव्हते की, कोणत्याही देशातील स्पर्धा अखेरच्या क्षणी दुसऱ्या देशात शिफ्ट केली असेल. पण भारतात २००९ साली असे झाले होते. आता करोनामुळे पुन्हा असे घडत आहे. इंग्लंडचा धाडसी निर्णय एका बाजूला संपूर्ण जगभरात क्रिकेट बंद असताना इंग्लंड क्रिकेट बोर्डाने वेस्ट इंडिज दौऱ्याचे आयोजन केले. त्यानंतर पाकिस्तान सोबत द्विपक्षीय मालिका होणार आहे. आयसीसीने टी-२० वर्ल्ड कप स्थगित केल्यामुळे आयपीएलचे आयोजन शक्य झाले.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3g0BY3A
No comments:
Post a Comment