Ads

Thursday, July 30, 2020

माजी कर्णधाराची क्रिकेट पाकिस्तान.कॉम मुलाखत; BCCIने बंदी का घातली होती माहित नाही

कराची: मॅच फिक्सिंग प्रकरणी आजीवन बंदीला सामोरे गेलेला भारताचा माजी कर्णधार याने बीसीसीआयने माझ्यावर का बंदी घातली होती याचे उत्तर अद्याप मिळाले नाही, असे म्हटले. बीसीसीआयने डिसेंबर २००० साली अझरूद्दीवर आजीवन बंदी घातली होती. क्रिकेट पाकिस्तान.कॉम ला दिलेल्या मुलाखतीत अझरूद्दीने सांगितले की, मोठ्या न्यायालयीन लढाईनंतर आंध्र प्रदेश उच्च न्यायालयाने २०१२ साली माझ्यावरील बंदी हटवली. जे काही झाले त्यासाठी मी कोणाला दोषी देत नाही. माझ्यावर बंदी का घालण्यात आली याचे उत्तर आजही मिळाले नाही. वाचा- बंदीच्या निर्णयानंतर मी त्या निर्णयाविरुद्ध लढण्याचे ठरवले. मला आनंद होतोय की १२ वर्षानंतर मी त्यातून मुक्त झालो. हैदराबाद क्रिकेट संघाचा अध्यक्ष झाल्यानंतर बीसीसीआयच्या वार्षिक बैठकीत सहभागी होताना मला खुप आनंद झाल्याचे अझरने सांगितले. भारताकडून ९९ कसोटीत ६ हजार १२५ आणि ३३४ वनडेत ९ हजार ३७८ धावा करणाऱ्या अझरचे नाव २०१९ साली राजीव गांधी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवरील एका स्टॅडला देण्यात आले आहे. वाचा- भारताकडून १०० कसोटी सामने खेळता न आल्याबद्दलचे दुख: नसल्याचे तो म्हणाला. मला वाटते की जे नशिबात असते तेच मिळते. मला वाटत नाही की ९९ कसोटी सामने खेळण्याचा माझा विक्रम कोणी मोडू शकेल. कारण चांगला खेळाडू १००हून अधिक कसोटी नक्की खेळेल. वाचा- मी जेव्हा खराब फॉममध्ये होतो तेव्हा पाकिस्तानचे महान फलंदाज जहीर अब्बास यांनी मला मार्गदर्शन केले होते. तशाच पद्धतीने मी देखील युनिस खान याची मदत केली होती. १९८९च्या पाकिस्तान दौऱ्यात माझी निवड झाली नव्हती. कारण माझा फॉम खराब होता. तेव्हा कराचीत मी सराव करत असताना अब्बास यांनी माझी अडचण विचारली. त्यांनी मला ग्रिपमध्ये थोडा बदल करण्यास सांगितला. मी त्यानुसार बदल केल्यानंतर धावा झाल्या, असे अझर म्हणाला.


from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/2D4mjSP

No comments:

Post a Comment

BJP’s Rajya Sabha strength falls below 100; may rise soon

A month after touching the mark of 100 seats for the first time in Rajya Sabha, BJP’s numerical strength has come down to 95 as five of its ...