मुंबई: भारतीय क्रिकेट संघातील माजी खेळाडू आणि आता समालोचक म्हणून भूमिका पार पाडणारे यांनी बीसीसीआयला एक मेल पाठवला आहे. या मेलमंध्ये त्यांनी आयपीएलच्या समालोचकांच्या पॅनलमध्ये समावेश करण्याची विनंती केली आहे. बीसीसीआयने मार्च महिन्यात त्यांना समालोचकांच्या पॅनलमधून हटवले होते. भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात मार्च महिन्यात वनडे मालिका होती. ही मालिका कोरनामुळे रद्द करण्यात आली. पण त्याआधी मांजरेकर यांना समालोचक पदावरून हटवण्यात आले. आता मांजरेकरांची इच्छा आहे की त्यांचा पुन्हा समावेश करण्यात यावा जेणेकडून १९ सप्टेंबर ते ८ नोव्हेंबर या काळात होणाऱ्या आयपीएलमध्ये ते कॉमेंटरी करू शकतील. वाचा- मांजरेकरांनी बीसीसीआयला एक मेल पाठवला आहे. या मेलची प्रत टाइम्स ऑफ इंडियाला मिळाली आहे. यात माजी क्रिकेटपटूने बोर्डाला आश्वासन दिले आहे की, यापुढे बीसीसीआयचे नियम पाळेन. विशेष म्हणजे याबाबत मांजरेकरांनी बोर्डाला पाठवलेला हा दुसरा इमेल आहे. काय म्हणतात मांजरेकर.... आदरणीय सदस्य, आशा आहे की तुम्ही सर्व जण ठीक असाल. तुम्हाला याआधीही माझा इमेल मिळाला असेल. ज्यात मी समालोचक म्हणून काम करण्याबाबत माझी भूमिका स्पष्ट केली होती. आता आयपीएलच्या तारखांची घोषणा झाली आहे आणि बीसीसीआय टीव्ही लवकरच कॉमेंटरी पॅनलची निवड करेल. तुमच्याद्वारे निश्चित केलेल्या नियमानुसार काम करण्यास मला नक्की आवडेल. अखेर मी तुमच्या प्रॉटक्शनच्या नियमानुसार काम करतो. गेल्या वेळी कदाचीत मला या नियमांची पूर्ण माहिती नव्हती. धन्यवाद. वाचा- या संदर्भात आम्ही संजय मांजरेकर यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला पण ते प्रतिक्रिया देण्यासाठी उपलब्ध झाला नाही. काय झाले होते गेल्या वर्षी वर्ल्ड कप स्पर्धेत संजय मांजरेकर यांनी रविंद्र जडेजासंदर्भात एक वक्तव्य केले होते. त्यानंतर टीम इंडियातील काही खेळाडूंनी बीसीसीआयकडे तक्रार केली होती. त्यानंतर मांजरेकर यांना कॉमेंट्री पॅनलमधून हटवण्यात आले होते. वाचा- यासंदर्भात बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, आम्ही ही गोष्ट इथेच संपवत आहोत आणि मांजरेकरांना माफ करतोय. त्यांनी जडेजा संदर्भात केलेले वक्तव्यावर माफी मागितली आहे आणि संबंधित खेळाडूने देखील हे प्रकरण संपल्याचे सांगितले. मांजरेकरांनी समालोचक म्हणून नियमांचे पालन करणार असल्याचे सांगितले आहे. एक चांगले क्रिकेटपटू आणि समालोचक म्हणून त्यांची क्रिकेटबद्दल समज चांगली आहे. आता याबाबत अंतिम निर्णय अध्यक्ष सौरव गांगुली आणि सचिव जय शहा हेच घेतील.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/30cTbRW
No comments:
Post a Comment