![](https://maharashtratimes.com/photo/77012191/photo-77012191.jpg)
नवी दिल्ली: करोना व्हायरस संकटामुळे भारतीय क्रिकेट संघाचे सर्व सामने स्थगित करण्यात आले आहेत. भारतीय संघ या वर्षाच्या अखेरीस ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्या संदर्भात पूर्ण क्रिकेट विश्वाला उत्सुकता आहे. भारताच्या या दौऱ्याबद्दल माजी क्रिकेटपटू आणि खासदार याने महत्त्वाचे वक्तव्य केलंय. काही दिवसांपूर्वी बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुलीने टीम इंडियाच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्याला हिरवा कंदील दिला. या दौऱ्याबद्दल बोलताना गंभीर म्हणाला. ज्या पद्धतीने २०१८-१९ साली भारताने ऑस्ट्रेलियाचा पराभव केला होता. त्याच पद्धतीने या वेळी ही विराटच्या नेतृत्वाखाली ऑस्ट्रेलियाचा पराभव होईल. वाचा- अनेक माजी क्रिकेटपटूंचे मत आहे की, स्टीव्ह स्मिथ आणि डेव्हिड वॉर्नर हे दोघे संघात नसल्यामुळे भारताने ऑस्ट्रेलियात पहिला मालिका विजय मिळवला होता. अर्थात गंभीरला ही गोष्टी मान्य नाही. यावेळी स्मिथ आणि वॉर्नर असल्यामुळे काही फरक पडणार नाही. भारतीय गोलंदाज त्यांना अडचणीत आणू शकतात. २०१८-१९ साली भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात चार कसोटी सामन्यांची मालिका झाली होती. या मालिकेत भारताने २-१ असा विजय मिळवला होता. तर एक कसोटी ड्रॉ झाली होती. तेव्हा भारताकडून मालिकेत चेतेश्वर पुजाराने सर्वाधिक धावाकेल्या होत्या. ऋषभ पंतने एक शतक केले होते. ऑस्ट्रेलियाच्या मैदानावर भारताचा हा पहिला कसोटी मालिका विजय होता. वाचा- दरम्यान गंभीरने आयसीसीच्या अध्यक्षपदासाठी गांगुलीला पाठिंबा दिला आहे. जर गांगुली आयसीसीचा अध्यक्ष झाला तर भारतासाठी फायद्याचे ठरले. काही दिवसांपूर्वी शशांक मनोहर यांनी आयसीसीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. करोना व्हायरसमुळे मार्च महिन्यापासून क्रिकेटस्पर्धा रद्द करण्यात आल्या आहेत. जवळपास ३ महिन्यांनी आंतरारष्ट्रीय क्रिकेटला सुरूवात झाली. वेस्ट इंडिज आणि इंग्लंड यांच्यात कसोटी मालिकेला सुरुवात झाली. आता त्यानंतर पाकिस्तान इंग्लंड यांच्यात कसोटी मालिका होणार आहे. करोना व्हायरसमुळे यावर्षी आयपीएल स्पर्धा अनिश्तिच काळासाठी स्थगित करण्यात आली आहे. तर ऑस्ट्रेलियात होणारा टी-२० वर्ल्ड कप स्पर्धा रद्द होण्याची शक्यता आहे. या सर्व पाश्वभूमीवर महत्त्वाचा मानला जातो. त्यामुळे संपूर्ण क्रिकेट विश्वाचे लक्ष या दौऱ्याकडे आहे. हा दौरा झाल्यास क्रिकेट ऑस्ट्रेलियाला आतापर्यंत झालेले आर्थिक नुकसान भरून काढता येईल.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/2DNKpBb
No comments:
Post a Comment