Ads

Tuesday, July 21, 2020

फक्त ८७ सामन्यात घेतल्या ५०० विकेट!

नवी दिल्ली: क्रिकेटमध्ये फलंदाजांचे वर्चस्व असले तरी काही गोलंदाज असे आहेत ज्यांनी अनेक वर्ष आपला दबदबा कायम ठेवला. संघाच्या विजयात या गोलंदाजांनी महत्त्वाची अशी भूमिका पार पाडली आहे. जलद गोलंदाजांनी वेगाने तर फिरकीपटूंनी फिरकीने फलंदाजांना अडचणीत आणले. कसोटी क्रिकेटमध्ये सर्वात यशस्वी ठरलेले आणि कमी डावात ५०० विकेट घेणाऱ्या गोलंदाजांच्या कामगिरीवर एक नजर... वाचा- कसोटी क्रिकेटच्या १४३ वर्षाच्या इतिहासात फक्त सहा गोलंदाज असे आहेत ज्यांनी ५०० पेक्षा जास्त विकेट घेतल्या. कमी डावात ५०० विकेट घेणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत पाचव्या स्थानावर दोन गोलंदाज आहेत. वेस्ट इंडिजचा जलद गोलंदाज वॉल्शने कसोटी क्रिकेटमध्ये सर्व प्रथम ५०० विकेट घेतल्या. ९०च्या दशकात वेस्ट इंडिजच्या गोलंदाजीची कमान वॉल्शकडे होती. तर इंग्लंडचा गोलंदाज जेम्स अॅडरसनने काही वर्षांपूर्वी ५०० विकेट घेण्याची कामगिरी पूर्ण केली. या दोन्ही गोलंदाजांनी १२९ कसोटीत ५०० विकेट घेतल्या. वॉल्शने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध २००१ मध्ये तर अॅडरसनने २०१७ मध्ये वेस्ट इंडिज विरुद्ध ५०० विकेट पूर्ण केल्या. क्रिकेटमध्ये पदार्पण केल्यानंतर वॉल्शने १६ वर्ष १२८ दिवसांनी तर अॅडरसनने १४ वर्ष १०८ वर्षांनी ही कामगिरी केली. वॉल्शने कसोटीत ५१९ तर अॅडरसनने ५४८ विकेट घेतल्या. वाचा- सर्वात वेगाने ५०० विकेट घेणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत ऑस्ट्रेलियाचा दिग्गज फलंदाज ग्लेन मॅग्राचा समावेश चौथ्या स्थानावर आहे. त्याने १२४ कसोटीत एकूम ५६३ विकेट घेतल्या. तर १००व्या कसोटीत ५०० विकेट घेण्याची कामगिरी केली. ही कामगिरी मॅग्राने इंग्लंड विरुद्ध अॅशेस मालिकेत केली होती. जगातील सर्वोत्तम संघाची निवड केल्यास त्यात ऑस्ट्रेलियाचा फिरकीपटू याचा समावेश नक्कीच होता. कसोटी क्रिकेटमध्ये ७०८ विकेट घेणाऱ्या वॉर्नने फिरकीच्या जोरावर फलंदाजांना नाचवले होते. त्याने श्रीलंकेविरुद्ध १०८व्या कसोटीत ५०० विकेट घेण्याची कामगिरी केली. वॉर्नने करिअरमध्ये ५७.४च्या सरासरीने विकेट घेतल्या. त्याने १४५ कसोटीत ३७ वेळा पाच तर १० वेळा १० विकेट घेण्याची कामगिरी केली. सर्वाधिक विकेट घेणाऱ्याच्या यादीत तो दुसऱ्या स्थानावर आहे. वाचा- जगातील अव्वल गोलंदाज शेन वॉर्न आणि यांच्यापेक्षा भारताच्या अनिल कुंबळेची शैली वेगळी होती. कुंबळेचा चेंडू वॉर्न आणि मुरली प्रमाणे वळत नसला तरी फलंदाजाला आपल्या जाळ्यात अडकवण्याचे कौशल्य त्याच्याकडे होते. कुंबळेने ५०० विकेटचा टप्पा १०५व्या कसोटीत पूर्ण केला. पदार्पणानंतर १५ वर्ष २१२ दिवसात त्याने ही कामगिरी केली. १३२ कसोटीत कुंबळेच्या नावावर ६१९ विकेट आहेत.५००च्या क्लबमध्ये समावेश झालेला तो एकमेव गोलंदाज आहे. कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट घेणाऱ्या श्रीलंकेच्या मुथय्या मुरलीधरनने कसोटी फक्त ८७ कसोटीत ५०० विकेटचा टप्पा पूर्ण केला. सुरुवातीच्या काळात त्याची शैली वादग्रस्त ठरवण्यात आली. पण त्यातून तो बाहेर पडला. मुरलीने १३३ कसोटीत ८०० विकेट घेतल्या आहेत. क्रिकेटमध्ये पदार्पण केल्यानंतर त्याने ११ वर्ष आणि २०१ दिवसात ही कामगिरी केली होती. त्याने कसोटीत ६७ वेळा पाच तर २२ वेळा १० विकेट घेतल्या आहेत. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये मुरलीच्या नावावर १ हजार ३४७ विकेट आहेत. यात कसोटीत ८००, वनडेत ५३४ आणि टी-२० मधील १३ विकेटचा समावेश आहे.


from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/2CUVaRW

No comments:

Post a Comment

BJP’s Rajya Sabha strength falls below 100; may rise soon

A month after touching the mark of 100 seats for the first time in Rajya Sabha, BJP’s numerical strength has come down to 95 as five of its ...