Ads

Sunday, July 19, 2020

धीम्यागतीने शतक करणारे फलंदाज; या खेळाडूने घेतले ४१९ चेंडू!

नवी दिल्ली: वेस्ट इंडिज आणि इंग्लंड यांच्यात दुसरा कसोटी सामना सध्या सुरू आहे. इंग्लंडकडून बेन स्टोक्सने करिअरमधील १०वे शतक झळकावले. स्टोक्सने १७६ धावा केल्या. यामुळे इंग्लंडने पहिल्या डावात ९ बाद ४६९ धावा करता आल्या. स्टोक्सने शतक पूर्ण करण्यासाठी २५६ चेंडूचा सामना केला. त्याचे कसोटी करिअरमधील हे सर्वात धीम्यागतीने केलेले शतक ठरले. वाचा- कसोटी क्रिकेटमध्ये असे अनेक क्रिकेटपटू आहेत ज्यांनी धीम्यागतीने शतक केले. स्टोक्सच्या या धीम्या शतकाच्या निमित्ताने जाणून घेऊयात कसोटी क्रिकेटमध्ये सर्वात धीम्यागतीने शतक करणारे पाच फलंदाज... थिलन समरवीरा (श्रीलंका): धीम्यागतीने शतक करणाऱ्या फलंदाजांमध्ये पाचव्या स्थानी लंकेचा थिलन समरवीरा. त्याने २००३-०४ मध्ये इंग्लंडविरुद्ध कोलंबो कसोटीत ३४५ चेंडूत शतक केले. या सामन्यात त्याने ४०८ चेंडूत १४२ धावा केल्या. हा सामना श्रीलंकेने एक डाव आणि २१५ धावांनी जिंकला. वाचा- जिम्मी अॅडम्स (वेस्ट इंडिज): २००० साली झिम्बाब्वेविरुद्ध किंग्सटन कसोटीत जिम्मीने ३६५ चेंडूत शतक केले. या सामन्यात वेस्ट इंडिजच्या पहिल्या डावात जिम्मीने ३७२ चेंडूत नाबाद १०१ धावा केल्या. हा सामना वेस्ट इंडिजने १० विकेटनी जिंकला. क्लाइव्ह राडली (इंग्लंड): न्यूझीलंडविरद्ध १९७८ साली झालेल्या ऑकलंड कसोटी सामन्यात इंग्लंडच्या क्लाइव्ह राडलीने ३९६ चेंडूत शतक पूर्ण केले. त्याने ५२४ चेंडूत १५८ धावा केल्या. हा कसोटी सामना ड्रॉ झाला. न्यूझीलंडविरुद्धच्या या सामन्यात क्लाइव्ह तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करण्यास आले होते. (भारत): १९९२ साली झिम्बाब्वेविरुद्ध हरारे कसोटी सामन्यात भारताच्या संजय मांजरेकरने ३९७ चेंडूत शतक केले. मांजरेकर यांनी ९ तास फलंदाजी केली या सामन्यात झिम्बाब्वेच्या संघाने शानदार कामगिरी केली होती. प्रथम फलंदाजी करत त्यांनी ४५६ धावा केल्या होत्या. भारताची अवस्था ५ बाद १०४ झाली होती. तेव्हा मांजरेकर यांनी कपिल देव सोबत मॅरेथॉन खेळी केली. मांजरेकर यांनी ४२२ चेंडूत १०४ धावा केल्या. हा सामना ड्रॉ झाला होता. (पाकिस्तान): कसोटी सर्वात धीम्यागतीने शतक करण्याचा विक्रम पाकिस्तानच्या मुदस्सर नझर यांच्या नावावर आहे. १९७७ साली इंग्लंडविरुद्ध लाहोर कसोटीत त्यांनी ४१९ चेंडूत १०० धावा केल्या. या सामन्यात पाकिस्तानचा विकेट वेगाने पाडत होत्या. तेव्हा नझर यांनी धीमी फलंदाजी केली. ते ५९१ मिनिट फलंदाजी करत होते. हा सामना देखील ड्रॉ झाला.


from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3jkGb4g

No comments:

Post a Comment

BJP’s Rajya Sabha strength falls below 100; may rise soon

A month after touching the mark of 100 seats for the first time in Rajya Sabha, BJP’s numerical strength has come down to 95 as five of its ...