नवी दिल्ली: भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्यात खेळाडूंवर प्रचंड तणाव असतो. जेव्हा सामना वर्ल्ड कपमधील असतो तेव्हा तर त्याकडे संपूर्ण जगाचे लक्ष असते. २००७ साली आयसीसी टी-२० वर्ल्ड कपमध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्याचा निकाल बॉल आऊटवर लागला होता. या भारतीय गोलंदाजाने सर्व चेंडू विकेटवर मारले तर पाकिस्तानला एकही चेंडू विकेटवर मारता आला नाही. या घटनेबद्दल तेव्हाचे गोलंदाजीचे प्रशिक्षक आणि भारताचे माजी गोलंदाज यांनी मोठा खुलासा केला. भारताच फिरकीपटू आर.अश्विन याच्या सोबत यूट्यूब शो डीआरएस विथ अॅश मध्ये बोलताना प्रसाद म्हणाले, आम्ही वर्ल्ड कपमधील नियमांचे पालन केले. जेव्हा टी-२० सामना होतो. तेव्हा सुपर ओव्हरच्या नियमांचा आम्ही अभ्यास केला होता. आम्ही फलंदाज आणि गोलंदाज यांच्याकडून नेटमध्ये याचा सराव करून घेतला. संघात असे खेळाडू होते जे फलंदाजी आणि गोलंदाजी देखील करू शकत होते. यात एम.एस.धोनी, विरेंद्र सेहवगा, रॉबिन उथप्पा यांचा समावेश होता. वाचा- मला माहित होते की कोण विकेटवर बॉल मारू शकतो. म्हणूनच सेहवाग, उथप्पा आणि हरभजनकडून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. आम्हाला वाटले नव्हते की, मॅच बॉल आउटमध्ये जाईल. तो मोठा सामना होता आणि मी धोनीला पटवून दिले की हे तीन खेळाडू बॉल आउटमध्ये चेंडू विकेटवर मारतील. सेहवाग आणि उथप्पा यांना गोलंदाजी देण्याचा निर्णय माझा होता. याचे सर्वात महत्त्वाचे कारण म्हणजे हे दोघेही धीम्यागतीने गोलंदाजी करतात. त्यामुळे चेंडू नियंत्रणात असतो, असे प्रसादने सांगितले. मध्ये भारताने पाकिस्तानचा दोन वेळा पराभव केला होता. पहिला ग्रुप स्टेजमध्ये तर नंतर अंतिम सामन्यात पराभव करत पहिला टी-२० वर्ल्ड कप जिंकला होता. वाचा- तेव्हा वाटले सोहेलने कानाखाली मारली १९९६च्या वर्ल्ड कप स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान यांच्या लढतीत एक घटना घडली होती. पाकचा सलामीवीर आमिर सोहेल याने भारताचा गोलंदाज प्रसादला चिढवले होते. पाकिस्तानची फलंदाजी सुरू असताना आमिरने प्रसादच्या चेंडूवर कव्हर्सवर एक शानदार चौकार मारला. चौकार मारल्यानंतर सोहेलने प्रसादकडे पाहून इशारा केला की, मी अशाच पद्धतीने तुझ्या चेंडूवर चौकार मारेन. पण प्रसादने पुढच्या चेंडूवर सोहेलची बोल्ड घेतली आणि चोख उत्तर दिले. वाचा- भारतीय गोलंदाज आर. अश्विन याच्यासोबत बोलताना वेंकटेश प्रसादने १९९६च्या वर्ल्ड कपमधील त्या घटनेबद्दल सांगितले. जेव्हा सोहेलने माझ्या चेंडूवर चौकार मारला आणि इशारा करून सांगितले तेव्हा वाटले की कोणी तरी मला कानाखाली मारली आहे. सोहेलने केलेली स्लेजिंग माझ्यासाठी कानाखाली मारल्या प्रमाणे होती.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3eCCGTk
No comments:
Post a Comment