नवी दिल्ली: कसोटी क्रिकेटमध्ये फलंदाजाच्या संयमाची परीक्षा होते. जो फलंदाज खेळपट्टीवर टिकून राहतो तोच यशस्वी होतो. कसोटी क्रिकेटमध्ये एका डावात सर्वाधिक धावा कोणी केल्या या प्रश्नाचे उत्तर असेच सर्वजण देतील. लाराने कसोटीत नाबाद ४०० धावा केल्या आहेत. लाराच्या नावावर कसोटी मधील असा एक विक्रम आहे जो ऐकल्यानंतर तुम्हाला आश्चर्य वाटेल. वाचा- कसोटी क्रिकेटमध्ये धावा करण्याची गती संथ असते. त्यामुळे वेगवान खेळ केला जात नाही. कसोटीत सर्वाधिक धावांचा विक्रम करणाऱ्या लाराने या प्रकारात एकाच ओव्हरमध्ये सर्वाधिक धावा केल्या आहेत. वाचा- २००३-०४ साली जोहान्सबर्ग येथे दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटीत लाराने ही कामगिरी केली होती. आफ्रिकेने प्रथम फलंदाजी करत ५६१ धावांचा विशाल स्कोअर उभा केला. त्यानंतर वेस्ट इंडिजच्या डावाची सुरूवात झाली. लाराने आफ्रिकेचा गोलंदाज रॉबिन पिटरसनच्या एका ओव्हरमध्ये २८ धावा केल्या. या ओव्हरमध्ये लाराने ४,६,६,४,४,४ अशा धावांच्या मदतीने २८ धावांचा पाऊस पाडला. वाचा- वाचा- लाराने या सामन्यात द्विशतकी खेळी केली. त्याने २७४ चेंडूत २०२ धावा केल्या. यात ३२ चौकार आणि २ षटकारांचा समावेश होता. अर्थात या खेळीनंतर देखील वेस्ट इंडिजचा आफ्रिकेविरुद्ध १८९ धावांनी पराभव झाला. २०१३-१४ मध्ये ऑस्ट्रेलियाच्या जॉर्ज बेली इंग्लंड विरुद्ध जेम्स अॅडरसनच्या एका ओव्हरमध्ये २८ धावा करत लाराच्या विक्रमाशी बरोबरी केली. लाराने २००६-०७ मध्ये पाकिस्तानविरुद्ध दानिश कनेरियाच्या ओव्हरमध्ये २६ धावा केल्या होत्या.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/2KUhjR2
No comments:
Post a Comment