नवी दिल्ली: महेंद्र सिंह धोनीनंतर भारतीय क्रिकेट संघाचा विक्रटकिपीर कोण असेल याचे उत्तर काही दिवासांपर्यंत तरी असेच होते. पंतच्या खराब कामगिरीमुळे आता ती जागा केएल राहुलने घेतली आहे. अर्थात पंत अद्यापही भारताचा नियमीत विकेटकिपर आहे. पंतने धोनीला नेहमी त्याचा मार्गदर्शक मानले आहे. वर्ल्ड कप विजेत्या या कर्णधाराबद्दल पंतने केलेले वक्तव्य आता चर्चेत आले आहे. वाचा- धोनी मदत करतो पण प्रश्नाचे पूर्ण उत्तर देत नाही, असे पंतने सांगितले. धोनीची इच्छा असते की संबंधित प्रश्नाचे उत्तर खेळाडूने स्वत: शोधावे. करोना व्हायरसमुळे आयपीएल स्पर्धा स्थगित करण्यात आली आहे. अशात दिल्ली कॅपिटल्सच्या इंस्टाग्राम चॅटमध्ये बोलताना ऋषभ पंत म्हणाला, धोनी मैदानात आणि मैदानाबाहेर माझा मार्गदर्शक असतो. मी कोणत्याही प्रकारचा अडचणीसाठी त्याला संपर्क करतो. तो नेहमी मला मार्गदर्शन करतो. पण कधीच पूर्ण उत्तर सांगत नाही. त्याची इच्छा असते की कोणी त्याच्यावर अवलंबून राहू नये. धोनी समस्या सोडवण्यासाठी मार्ग दाखतो, असे पंतने सांगितले. वाचा- फलंदाजी करताना धोनी हा माझा सर्वात्तम जोडीदार आहे. पण सध्या त्याच्या सोबत फलंदाजी करण्याची संधी मिळत नाही. वाचा- भारतीय क्रिकेट संघात धोनीनंतर पंतचा विकेटकिपर म्हणून समावेश केला होता. पण अनेक सामन्यात पंतने खराब कामगिरी केली. इतक नव्हे तर महत्त्वाच्या सामन्यात गरज असताना बेजबाबदारपणे खेळ करून विकेट गमावली. त्यामुळेच केएल राहुलला संधी दिली गेली. राहुलने विकेटकिपर आणि फलंदाजीत चांगली कामगिरी केल्यामुळे आता पंतला अंतिम ११ मध्ये स्थान मिळवण्यासाठी संघर्ष करावा लागत आहे.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/2VWMth2
No comments:
Post a Comment