दुबई: आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने अर्थात आयसीसीने शुक्रवारी एक मे रोजी ताजी क्रमवारी जाहीर केली. आयसीसीने कसोटी, वनडे आणि टी-२० प्रकारातील क्रमवारी जाहीर केली असून ताज्या क्रमवारीत भारत आणि पाकिस्तान क्रिकेट संघाला मोठा धक्का बसला आहे. वाचा- विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या भारतीय क्रिकेट संघाला कसोटीमधील तर पाकिस्तान क्रिकेट संघाला टी-२० मधील अव्वल स्थान गमवावे लागले आहे. आयसीसीच्या ताज्या क्रमवारीत कसोटी आणि टी-२० मध्ये ऑस्ट्रेलिया संघाने बाजी मारली आहे. वाचा- आयसीसीच्या वार्षिक क्रमवारीनुसार ऑस्ट्रेलियाचा कसोटी संघाचे ११६ गुण आहेत. तर ११५ गुणांसह न्यूझीलंड दुसऱ्या तर १४४ गुणांसह भारत तिसऱ्या स्थानावर. वनडेत इंग्लंडचा संघ १२७ गुणांसह पहिल्या, ११९ गुणांसह टीम इंडिया दुसऱ्या तर ११६ गुणांसह न्यूझीलंड तिसऱ्या स्थानावर आहे. टी-२० क्रमवारीत ऑस्ट्रेलिया २६८ गुणांसह पहिल्या, इंग्लंड २६६ गुणांसह दुसऱ्या तर भारत २६६ गुणांसह तिसऱ्या स्थानावर आहे. ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाने कसोटी आणि टी-२० क्रमवारीत अव्वल स्थान मिळवले. तर गेल्यावर्षी आयसीसी वनडे वर्ल्ड कपचे विजेतेपद मिळवणाऱ्या इंग्लंड संघाला वनडे क्रमवारीत अव्वल स्थान मिळाले. कसोटी क्रमवारीत भारतीय संघ ऑक्टोबर २०१६ पासून पहिल्या स्थानावर होता. पण आता हे स्थान ऑस्ट्रेलियाने मिळवले. अशीच अवस्था टी-२० बाबत पाकिस्तान संघाची झाली आहे. पाकिस्तानचा संघ गेल्या २७ महिन्यांपासून टी-२० क्रमवारीत पहिल्या स्थानावर होता. पण ते स्थान ऑस्ट्रेलियाला मिळाले. धक्कादायक म्हणजे पहिल्या स्थानावर असलेला पाकिस्तानचा संघ थेट चौथ्या स्थानावर गेला. तर कसोटी क्रमवारीत भारतीय संघ पहिल्या स्थानावर तिसऱ्या स्थानावर पोहोचला. कसोटी क्रमवारीत न्यूझीलंडचा संघ दुसऱ्या स्थानावर आहे.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/2SFnEnR
No comments:
Post a Comment