मुंबई: करोना व्हायरसमुळे जगभरातील स्पर्धा स्थगित करण्यात आल्या आहेत. अशात क्रिकेटमध्ये शांतता आहे. त्यामुळेच चाहत्यांकडून आणि खेळाडूंकडून जुने विक्रम, आठवणी याचा उजाळा दिला जात आहे. आयसीसी आणि बीसीसीआय सोशल मीडियावर चाहत्यांसाठी नवे नवे प्रश्न आणि माहिती देत आहेत. अशातच एका ट्विटवरून वाद सुरू झाला. वाचा- फॉक्स क्रिकेटने क्रिकेटमधील सर्वात दुबळ्या फलंदाजांची यादी तयार केली. ही यादी त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट केली. फॉक्स क्रिकेटने यात दोन भारतीय खेळाडूंचा समावेश केला आहे. पहिले नाव आहे आणि दुसरे जसप्रीत बुमराह याचे. क्रिकेटमध्ये ज्या खेळाडूची फलंदाजी खराब असते आणि म्हणून त्याना नेहमी शेवटच्या क्रमांकावर पाठवले जाते त्याला टेलिंडर्स असे म्हणतात. फॉक्स क्रिकेटने अशा खेळाडूंची यादी तयार केली. या यादीत अजित आगरकरचा समावेश केला म्हणून प्रसिद्ध समालोचक यांनी फॉक्स क्रिकेटला आरसा दाखवला. वाचा- टेलिंडर्सच्या यादीत अजित आगरकरचा समावेश केल्याबद्दल भोगले यांना धक्काच बसला. फॉक्स क्रिकेटला उत्तर देताना ते म्हणाले, आगरकर? त्याच्या नावावर एक कसोटी शतक आहे आणि वनडेत त्याने २१ चेंडूत ५० धावा केल्या आहेत. आगरकरची फलंदाजी आणि तो टेलिंडर्स नाही हे सांगण्यासाठी भोगले यांचे वरील उत्तर फॉक्स क्रिकेटला पुरेसे ठरावे. अजित आगरकरने भारतीय संघाकडून १९१ वनडे आणि २६ कसोटी सामने खेळले आहेत. त्याने कसोटी एक शतक आणि वनडेत ३ अर्धशतक केले आहे. फॉक्स क्रिकेटने या संघात भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह याचा समावेश केला आहे. बुमराहचे करिअर नुकतेच सुरु झाले आहे. असा आहे फॉक्स क्रिकेटचा टेलिंडर्स संघ ख्रिस मार्टीन (न्यूझीलंड), कर्टनी वॉल्श (वेस्ट इंडिज), ग्लेन मॅग्रा (ऑस्ट्रेलिया), मॉटी पनेसर (इंग्लंड), अजित आगरकर (भारत), जसप्रीत बुमराह (भारत), फिल टफनेल (इंग्लंड), ब्रूस रीड (ऑस्ट्रेलिया), डेव्होन मॅल्कम (इंग्लंड), हेन्री ओलंगा (झिम्बाब्वे), पोमी मांग्वा (झिम्बाब्वे)
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/2VTlvXn
No comments:
Post a Comment