मुंबई: क्रिकेटच्या तिनही प्रकारात शतक करणारे काही मोजके खेळाडू आहेत. यापैकी भारताचा हा एक होय. रैनाने आजच्या दिवशी म्हणजे २ मे २०१० मध्ये टी-२० प्रकारात शतक झळकावले होते. भारतीय संघाकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये शतक करणारा तो पहिला फलंदाज ठरला होता. आयसीसी टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत रैनाने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध ही कामगिरी केली होती. वाचा- सामन्यात दक्षिण आफ्रिकेने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. पहिल्याच षटकातील दुसऱ्या चेंडूवर मुरली विजय शून्यावर बाद झाल्याने सुरेश रैना तिसऱ्या स्थानावर खेळण्यास आला. रैनाने या सामन्यात ६० चेंडूत १०१ धावांची खेळी केली. यात ९ चौकार आणि ५ षटकारांचा समावेश होता. रैनाला युवराज सिंगने चांगली साथ देत ३० चेंडूत ३७ धावा केल्या होत्या. या दोघांनी तिसऱ्या विकेटसाठी ८८ धावांची भागिदारी केली होती. वाचा- भारताने २० षटकात ५ बाद १८६ धावा केल्या. त्यानंतर आफ्रिकेला १७२ धावात रोखले. भारताकडून आशिष नेहरा आणि पियुष चावला यांनी प्रत्येकी एक विकेट घेतल्या. या सामन्यात भारताने १४ धावांनी विजय मिळवला. पण भारताला स्पर्धेत सेमीफायनलमध्ये पोहोचता आले नाही. वाचा- रैनानंतर रोहित शर्मा आणि केएल राहुल यांनी भारताकडून टी-२०त शतकी खेळी केली आहे. रैनाने टी-२० प्रकारात शानदार अशी फलंदाजी केली असून आयपीएलमध्ये १९३ सामन्यात त्याच्या नावावर ५ हजार ३६८ धावा आहेत.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/2VXYgf4
No comments:
Post a Comment