नवी दिल्ली: स्पॉट फिक्सिंगमुळे अनेक वर्ष क्रिकेटपासून दूर राहिलेल्या श्रीसंतने एका लाइव्ह चॅट दरम्यान विराट कोहलीनंतर भारतीय क्रिकेट संघाचे नेतृत्व कोण करू शकेल आणि असे कोणते खेळाडू आहेत जे करू शकतील याबद्दल सांगितले. वाचा- वनडे क्रिकेटमध्ये सचिन तेंडुलकरने सर्व प्रथम द्विशतक केले होते. त्यानंतर आठ वेळा वनडेत द्विशतक झाली आहेत. वनडेतील सर्वाधिक धावांचा विक्रम रोहित शर्माच्या नावावर आहे. त्याने २६४ धावा केल्या होत्या. आता वनडेत त्रिशतकी खेळी कोण करते याची सर्वांना उत्सुकता आहे. श्रीसंतने वनडे क्रिकेटमध्ये त्रिशतक करू शकतील अशा तिघा फलंदाजांची नावे सांगितली आहेत. विशेष म्हणजे त्यापैकी दोघांनी एकदाही १२० च्यापुढे धावा केल्या नाहीत. वाचा- श्रीसंतच्या मते भारतीय संघाचा कर्णधार आणि हे दोन खेळाडू वनडेत त्रिशतक करू शकतली. याशिवाय इंग्लंडचा फलंदाज देखील अशी कामगिरी करू शकेल. वनडेत सर्वाधिक वेळा द्विशतक करणारा रोहित शर्मा किंवा न्यूझीलंडचा मार्टिन गप्टिल ज्याने नाबाद २३७ धावा केल्या होत्या. या दोघांची निवड श्रीसंतने केली नाही. विराटनंतर कोण? विराट कोहलीनंतर भारतीय संघाचे नेतृत्व कोण करू शकेल या प्रश्नावर म्हणाला, भविष्यात भारतीय संघाचे नेतृत्व केएल राहुल करू शकेल. राहुल तिनही प्रकारात चांगली कामगिरी करत आहे. विराट प्रमाणे राहुल देखील फिटनेसकडे लक्ष देतो.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3bXOoHw
No comments:
Post a Comment