बेंगळुरू: कर्नाटक आणि राजस्थान रॉयल्सचा ऑलराउंडर यानं कर्नाटक प्रीमिअर लीग २०१९ मध्ये धम्माल उडवून दिली आहे. शुक्रवारी झालेल्या सामन्यात त्यानं एकाच सामन्यात ८ विकेट घेताना ३९ चेंडूत वेगवान शतक ठोकण्याचा विक्रमही केला. बेल्लारी टस्कर्सकडून शिवमोगा लायन्सविरुद्ध खेळताना कृष्णप्पा गौतमने ही कमाल केली आहे. कृष्णप्पा गौतमची कामगिरी ही क्रिकेटमधील सर्वोत्तम कामगिरी आहे. मात्र, सामन्यांना टी-२० म्हणून दर्जा नाही. कृष्णप्पाने एम. चिन्नास्वामी स्टेडिअममध्ये शिवमोगा लायन्सविरुद्ध खेळलेल्या सामन्यात ३९ चेंडूत शतक पूर्ण केलं. त्यानं ५६ चेंडूत एकूण १३४ धावा केल्या. त्यात १३ षटकार आणि ७ चौकारांचा समावेश होता. कर्नाटक प्रीमिअर लीग संघाकडून हे आतापर्यंतचं सर्वाधिक वेगवान शतक आहे. फलंदाजीबरोबर त्यानं गोलंदाजीतही सरस कामगिरी केली. त्यानं ४ षटकांत ८ फलंदाजांना तंबूचा रस्ता दाखवला. त्याच्या जादुई फिरकीपुढं शिवमोगा लायन्सचे फलंदाज टिकूच शकले नाहीत.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/2Hn8ygY
No comments:
Post a Comment