मुंबई मुंबईचा उदयोन्मुख क्रिकेटपटू पृथ्वी शॉनं खोकल्यासाठी अनावधानाने घेतलेल्या औषधामुळे त्याला क्रिकेटपासून आठ महिने दूर राहावे लागणार आहे. पृथ्वी शॉवर बीसीसीआयने आठ महिन्यांची क्रिकेट खेळण्यावर बंदी घातल्यानंतर त्याला पाठिंबा देण्यासाठी क्रिकेट समालोचक यांनी एक ट्विट केले आहे. हा लहान आहे. त्याला काळजीपूर्वक हाताळावं आणि योग्य मार्ग दाखवावा. या लहान मुलानं कठोर मेहनत करून यश मिळवलं आहे, असे हर्षा भोगले यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे. खोकल्यासाठी अनावधानाने घेतलेल्या औषधामुळे पृथ्वी शॉ डोपिंग चाचणीत दोषी ठरला आहे. पृथ्वीला बीसीसीआयने आठ महिन्यांसाठी निलंबित केले आहे. पृथ्वीवर कारवाई करण्यात आल्यानंतर रात्री अकरा वाजता हर्षा भोगले यांनी एक ट्विट करून तो लहान असून त्याला योग्य प्रकारे हाताळण्याचा सल्ला दिला आहे. ‘या लहान मुलाने कठोर मेहनत करुन यश मिळवलं आहे. भारतीय क्रिकेटने पृथ्वी शॉला काळजीपूर्वक हाताळायला हवं आणि त्याला योग्य मार्ग दाखवायला हवा, असे भोगले यांनी आपल्या ट्विटरवर म्हटलं आहे. बीसीसीआयकडून पृथ्वीला आठ महिन्यांसाठी निलंबित करण्यात आले आहे. १६ मार्च ते १५ नोव्हेंबर २०१९ असा निलंबनाचा कालावधी असणार आहे. त्यामुळे बांगलादेश आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्ध भारतात होणाऱ्या आगामी क्रिकेट मालिकांमध्ये त्याला संधी मिळू शकणार नाही, असेही पुढे नमूद करण्यात आले आहे. बीसीसीआयच्या कारवाईनंतर पृथ्वी शॉनं एक ट्विट करीत ‘प्रामाणिकपणे मी माझी चूक स्वीकारत आहे. गेल्या स्पर्धेदरम्यान दुखापतग्रस्त असताना औषधे घेताना माझ्याकडून हे घडले असावे. क्रिकेट हे माझे आयुष्य असून मुंबईचे तसेच देशाचे प्रतिनिधित्व करणे हेच माझ्यासाठी सर्वाधिक अभिमानास्पद आहे. लवकरात लवकर दमदार पुनरागमन करण्याचा माझा मानस आहे’, असे म्हटले होते.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/2LS8Lg8
No comments:
Post a Comment