Ads

Monday, August 26, 2019

तळलेले चिकन, चॉकलेट मॅचविनर स्टोक्सचा आहार!

वृत्तसंस्था, पौष्टीक सलाड, प्रोटीन शेक... खेळाडूंच्या आहारात आजकाल सर्रास आढळणारे हे पदार्थ. यात तेलाशिवाय तयार झालेल्या मांसाहार, शाकाहार याचाही समावेश असतो; पण कसोटीत फलंदाजीला सामोरे जाण्याआधी एखाद्या खेळाडूने तळलेले चीकन (फ्राइड), चॉकलेटवर ताव मारला अन् पुढे याच चुरशीच्या कसोटीत आपल्या संघाला एकहाती विजय मिळवून दिला, असे सांगितले तर विश्वास बसेल? नाही ना... मात्र हे प्रत्यक्षात घडले असून याचे ‘ताजे, गरमागरम’ उदाहरण म्हणजे . याच स्टोक्सने रविवारी तिसऱ्या अॅशेस कसोटीत नाबाद १३५ धावांची खेळी करत अखेरच्या फलंदाजाला बरोबर घेत इंग्लंडला एका विकेटने निसटता विजय मिळवून दिला. स्कोअरबोर्डवर इंग्लंडची अवस्था ९ बाद २८६ अशी झाली होती तेव्हा अष्टपैलू स्टोक्स ६१ धावांवर खेळत होता. त्याला सोबत होती ती इंग्लंडचा अखेरचा फलंदाज जॅक लीच याची. वर्ल्डकपमध्ये न्यूझीलंडविरुद्धच्या फायनलमध्ये इंग्लंडसाठी तारणहार ठरल्याने स्टोक्स याआधीच इंग्लंडमध्ये ‘सुपरहिरो’ झाला आहे. त्यात रविवारी पारंपरिक प्रतिस्पर्धी ऑस्ट्रेलियाच्या हाता-तोंडाशी आलेला विजय हिरावून घेतल्याने इंग्लंडवासीयांनी स्टोक्सला डोक्यावर घ्यायचेच बाकी ठेवले आहे. शून्यातून आकार घेणारा स्टोक्स अॅशेस मालिकेतील तिसऱ्या कसोटीत ऑस्ट्रेलियाने इंग्लंडसमोर ३५९ धावांचे आव्हानात्मक लक्ष्य ठेवले होते. लक्ष्याचा पाठलाग करताना इंग्लंडची ९ बाद २८६ अशी स्थिती होती. ऑस्ट्रेलिया विजयासाठी एका विकेटची आवश्यकता होती. मात्र, बेन स्टोक्सने लीचसह दहाव्या विकेटसाठी ७६ धावांची अभेद्य भागीदारी करून इंग्लंडला विक्रमी विजय मिळवून दिला. स्टोक्सने २१९ चेंडूंत ११ चौकार व ८ षटकारांसह नाबाद १३५ धावांची खेळी केली. त्याच्या या झुंजार खेळीचे कौतुक होते आहे. विजयानंतर हेडिंग्ले स्टेडियममधील साऱ्यांनी उभे राहून अभिनंदन केले. हा माझ्यासाठी विशेष क्षण होता. कारण, असे पुन्हा पुन्हा घडत नसते. - बेन स्टोक्स. स्टोक्सची फिनिक्स भरारी ३ एप्रिल २०१६मध्ये कोलकात्याच्या इडन गार्डन्सवर इंग्लंड-विंडीज ही अंतिम लढत होती. इंग्लंडने ९ बाद १५५ धावा केल्या होत्या. लक्ष्याचा पाठलाग करताना विंडीजची ६ बाद १०७ अशी अवस्था झाली होती. मात्र, सॅम्युएल्स आणि ब्रेथवेटने किल्ला लढविला. अखेरच्या ६ चेंडूंत विंडीजला १९ धावांची गरज होती. हे अखेरचे षटक टाकत होता तो बेन स्टोक्स. मात्र, ब्रेथवेटने स्टोक्सला सलग चार षटकार लगावले. स्टोक्सला निराशा लपविता आली नाही. यानंतर मागील नऊ महिन्यांत तो दुसऱ्यांदा इंग्लंडचा ‘हिरो’ ठरला आहे. स्टोक्सच्या अंतिम लढतीतील जबरदस्त कामगिरीमुळेच यंदाचा वनडे वर्ल्ड कप इंग्लंडला उंचावता आला आहे. बॅड बॉय मला बहीण नाही. पण, जर मला बहीण असती, तर मी स्वत: तिचे लग्न बेन स्टोक्सशी लावून दिले असते. - ग्रॅम स्वॅन, इंग्लंडचा फिरकी गोलंदाज अष्टपैलू स्टोक्सची कामगिरी ५५ कसोटी ३४७९ धावा १३५ विकेट ९५ वनडे २६८२ धावा ७० विकेट २३ टी-२० २३२ धावा १० विकेट


from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/2KVZqlw

No comments:

Post a Comment

BJP’s Rajya Sabha strength falls below 100; may rise soon

A month after touching the mark of 100 seats for the first time in Rajya Sabha, BJP’s numerical strength has come down to 95 as five of its ...