अँटिगा: वेस्ट इंडिजविरुद्धच्या पहिल्या कसोटीत जेव्हा जेव्हा फलंदाजीसाठी आला तेव्हा भारताची धावसंख्या ३ बाद २५ होती. संकटात असलेल्या टीमला अजिंक्यने ८१ धावांच्या दमदार खेळीने सावरले. या डावात त्याचे शतक हुकले, पण त्याचे त्याला दु:ख नाही. 'मी स्वार्थी नाही. मैदानात असतो तेव्हा मी फक्त टीमचाच विचार करतो,' असं रहाणे म्हणाला. दिवसभराचा खेळ संपल्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत रहाणे म्हणाला, 'मला वाटतं या विकेटवर ८१ धावांचा खेळही खूप होता आणि आता आम्ही या कसोटीत चांगल्या स्थितीत आहोत. मी जेव्हा मैदानात असतो तेव्हा फक्त टीमचाच विचार करतो, मी स्वार्थी नाही. त्यामुळे मला शतक हुकल्याचं दु:ख नाही.' रहाणे पुढे म्हणाला, 'टीमसाठी केलेलं योगदान जास्त महत्त्वाचं ठरतं. मी माझ्या शतकाबद्दल विचार करत होतो. पण त्याची मला फार चिंता नव्हतो. परिस्थितीनुसार खेळणं अधिक महत्त्वाचं होतं.' रहाणेने यापूर्वीचं शतक २०१७ मध्ये श्रीलंकेविरुद्ध बनवलं होतं.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/2Nx78Ei
No comments:
Post a Comment