नवी दिल्ली: भारतीय क्रिकेट संघाच्या फलंदाजी प्रशिक्षकपदी माजी क्रिकेटपटू यांची नियुक्ती करण्यात आली आहे. आश्चर्याची बाब म्हणजे, विराट कोहली, रोहित शर्मा अशा दिग्गजांना मार्गदर्शन करण्यासाठी निवड करण्यात आलेल्या राठोड यांनी केवळ १३ आंतरराष्ट्रीय सामन्यांत भारताचं प्रतिनिधित्व केलं आहे. असं असतानाही त्यांची नियुक्ती करण्यात आल्यानं उलटसुलट चर्चा सुरू झाली आहे. एमएसके प्रसाद यांच्या अध्यक्षतेखालील निवड समितीनं नुकतीच टीम इंडियाच्या सपोर्ट स्टाफची घोषणा केली. गोलंदाजी प्रशिक्षक म्हणून भारत अरुण तर, क्षेत्ररक्षण प्रशिक्षक म्हणून आर. श्रीधर यांना कायम ठेवण्यात आलं आहे. आधीचे फलंदाजी प्रशिक्षक संजय बांगर यांच्या जागी राठोड यांना संधी देण्यात आली आहे. मात्र, राठोड यांच्या क्रिकेटमधील अनुभववारून चर्चेला पेव फुटलं आहे. राठोड यांनी केवळ सहा कसोटी व सात एकदिवसीय सामने खेळले आहेत. त्यांच्या नावावर अवघ्या ३२४ धावा आहेत. कसोटी क्रिकेटमध्ये त्यांची कामगिरी अजिबात प्रभावी नव्हती. कसोटीतील दहा डावांत १३.१०च्या सरासरीनं त्यांनी १३१ धावा केल्या आहेत. एकही अर्धशतक त्यांच्या नावावर नाही. एकदिवसीय सामन्यात राठोड यांनी केवळ १९३ धावा केल्या आहेत. त्याची सरासरी २७.५७ आहे. एकदिवसीय सामन्यात त्यांच्या नावावर दोन अर्धशतके असली तरी एकदाही त्यांना शतकी खेळी करता आलेली नाही. स्थानिक क्रिकेटमधील त्यांची कारकिर्द दीर्घ आहे. पंजाब व हिमाचल प्रदेशकडून प्रथम श्रेणी व अन्य स्पर्धांतून खेळताना त्यांनी ११४७३ धावा केल्या आहेत.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/2TYdfCR
No comments:
Post a Comment