
नवी दिल्ली: वेस्ट इंडीज आणि भारत यांच्यात दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेला गुरुवारपासून सुरुवात होणार आहे. या मालिकेत विराट ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पाँटिंगला मागे टाकू शकतो. कर्णधार म्हणून पाँटिंगने १९ शतके झळकावली आहेत. तर विराटच्या नावावर १८ शतके आहेत. भारतीय संघ डिसेंबर-जानेवारीत ऑस्ट्रेलियाविरुद्ध अखेरची कसोटी खेळला होता. त्यानंतर भारतीय संघ सातत्यानं मर्यादित षटकांचे सामने खेळला. जवळपास साडेसात महिन्यांनंतर भारत पुन्हा कसोटी मालिका खेळणार आहे. वेस्ट इंडीजविरुद्ध गुरुवारपासून अँटिग्वामध्ये पहिला कसोटी सामना होईल. याआधी वेस्ट इंडीजविरुद्ध एकदिवसीय मालिकेत कोहलीने दोन शतक झळकावले होते. कसोटी मालिकेतही हाच फॉर्म कायम राखण्याचा विराटचा प्रयत्न असेल. संघाचं कर्णधारपद सांभाळताना ४६ कसोटी सामन्यांत विराटनं १८ शतके केली आहेत. तर ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पाँटिंगच्या नावावर १९ शतके आहेत. या मालिकेत दोन शतके झळकावली तर तो रिकी पाँटिंगला मागे टाकेल. कर्णधार म्हणून दक्षिण आफ्रिकेच्या स्मिथच्या नावावर सर्वाधिक २५ शतके आहेत. दरम्यान, कसोटीत सर्वाधिक शतकांच्या बाबतीत सचिन तेंडुलकर ५१ शतकांसह अव्वल स्थानी आहे. तर कोहलीच्या नावावर २५ शतके आहेत.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/2Zbm6GD
No comments:
Post a Comment