अँटिगा: भारताने अँटिगा कसोटी चौथ्या दिवशीच खिशात घातली. विजयानंतर भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीने अजिंक्य रहाणेचं कौतुक केलं तसंच गोलंदाज जसप्रीत बुमराहला विराट कसोटी चॅम्पियनशीपमधला हुकुमाचा एक्का म्हणाला. बुमराहने ८ षटकांत अवघ्या ७ धावा दिल्या आणि ५ गडी बाद केले. रविवारी वेस्ट इंडीज दुसऱ्या डाव गुंडाळण्यासाठी भारताला अवघे २६.५ षटक पुरले. त्याआधी भारताने आपल्या दुसऱ्या डावात ७ गडी बाद ३४३ धावा करून डाव घोषित केला. विंडीजला ४१९ धावांचं लक्ष्य दिलं. १०० धावांत भारतानं विंडीजला गारद केलं. पहिल्या डावात ८१ आणि दुसऱ्या डावात १०२ धावांची फटकेबाजी करणाऱ्या अजिंक्य रहाणेचं कोहलीने कौतुक केलं, तर बुमराहला हुकुमाचा एक्का म्हणत त्याचंही कौतुक केलं. टेस्ट चॅम्पियनशीपमध्ये संघासाठी खूप महत्त्वाचा ठरणार आहे, असंही कोहली म्हणाला.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/2Pdp49G
No comments:
Post a Comment