Ads

Thursday, September 2, 2021

विराट कोहलीच्या चुकीचा भारतीय संघाला पहिल्याच दिवशी बसला मोठा फटका, पाहा नेमकं केलं तरी काय...

नवी दिल्ली : भारताचा कर्णधार विराट कोहलीकडून एक मोठी चुक घडल्याचे पाहायला मिळाले आणि गोष्टीचा फटका भारतीय संघाला चौथ्या कसोटीच्या पहिल्याच दिवशी बसलेला पाहायला मिळाला. नेमकं घडलं तरी काय, पाहा...तिसऱ्या कसोटीतील पराभवानंतर कर्णधार कोहली काहीच शिकला नसल्याचे पाहायला मिळाले. कारण चौथ्या सामन्यात कोहलीकडून एक मोठी चुक झाल्याचे पाहायला मिळाले. आतापर्यंत भारताला सर्वात जास्त उणीव भासते आहे ती मधल्या फळीतील फलंदाजाची. कारण आतापर्यंतच्या कसोटी मालिकेत भारताच्या मधल्या फळीला लौकिकाला साजेशी कामगिरी करता आलेली नाही. त्यामुळे चौथ्या कसोटीसाठी संघ निवडताना कोहलीला अतिरीक्त फलंदाज खेळवण्याची संधीही मिळाली. होती. कारण चौथ्या कसोटी सामन्यात मोहम्मद शमी आणि इशांत शर्मा हे दोघेही खेळणार नसल्याचे स्पष्ट झाले होते. त्यामुळे या दोघांच्या जागी एक वेगवान गोलंदाज आणि एक फलंदाज कोहलीला घेता आला असता. पण कोहलीने यावेळी संधीचा फायदा घेतला नाही. पाच गोलंदाजांनिशी खेळायचे, हे कोहलीने ठरवले होते. जर कोहलीला पाच गोलंदाज खेळवाचे होते, तर आतापर्यंत अपयशी ठरलेल्या फलंदाजाला त्याने संघाबाहेर करायला हवे होते. खासकरून रिषभ पंत हा सातत्याने अपयशी ठरताना दिसत आहे. त्यामुळे पंतला संघाबाहेर काढून जर लोकेश राहुलकडे यष्टीरक्षणाची जबाबदारी सोपवली असती तर नक्कीच संघात अतिरीक्त फलंदाज येऊ शकला असता. पण कोहलीने हा बदलही करण्याचे मनावर घेतले नाही आणि त्याचाच मोठा फटका भारताला चौथ्या कसोटीतही बसल्याचे पाहायला मिळाले आहे. कारण भारताचा पहिला डाव १९१ धावांत आटोपल्याचे पाहायला मिळाले. चौथ्या कसोटी सामन्याच्या पहिल्या डावात कोहलीने यावेळी अर्धशतक झळकावले. कोहलीला २२ धावांवर असताना जीवदान मिळाले होते. या जीवदानाचा फायदा घेत कोहलीने अर्धशतक झळकावले. पण अर्धशतक झळकावल्यावर कोहलीला एकही धाव करता आली नाही आणि तो ५० धावांवर बाद झाला. कोहली पुन्हा एकदा इंग्लंडमध्ये मोठी खेळी साकारण्यात अपयशी ठरल्याचेच आजदेखील पाहायला मिळाले.


from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3gWDRko

No comments:

Post a Comment

BJP’s Rajya Sabha strength falls below 100; may rise soon

A month after touching the mark of 100 seats for the first time in Rajya Sabha, BJP’s numerical strength has come down to 95 as five of its ...