INDvsENG : नॉटिंगहम : भारतीय क्रिकेट संघ सोमवारी आनंदी दिसत होता. प्रमुख सलामीवीर फलंदाज रोहित शर्माने सर्वांसाठी एका अनोख्या खेळाचे आयोजन केले होते. त्यामध्ये संघातील सर्व खेळाडू तसेच इतर सहकारीही सहभागी झाले होते. खेळाडूंना दोन संघांमध्ये विभागण्यात आले होते. क्षेत्ररक्षण प्रशिक्षक आर. श्रीधर यांच्याकडे टेनिस चेंडूला हवेत टोलवण्याचे काम सोपवण्यात आले होते. एका संघातील खेळाडूने हेल्मेटने तो चेंडू धुडकावून लावायचा होता, तर दुसऱ्या संघातील खेळाडूने तो हातात झेलायचा होता. रोहित शर्माने ट्विटरवर एक व्हिडिओ पोस्ट करत या खेळाविषयीची माहिती दिली. प्रत्येक संघाने घेतलेल्या झेलच्या एकूण संख्येद्वारे गुणांची गणना केली गेली. बीसीसीआयने अपलोड केलेल्या व्हिडिओमध्ये रोहित शर्मा खेळाची संकल्पना स्पष्ट करताना दिसतो. या खेळामध्ये कर्णधार विराट कोहली, अजिंक्य रहाणे यांच्यासह इतर खेळाडूंनी सहभाग घेतला होता. फलंदाजी प्रशिक्षक विक्रम राठोड यांनी या उपक्रमाबाबतची अधिक माहिती दिली. ते म्हणाले की, 'हा खूप मजेदार खेळ होता. मला वाटले की, सहाय्यक कर्मचारीही यात सहभागी झाले, तर आणखी मजा येईल आणि आम्ही तेच केले. त्या सर्वांचा खूप उपयोग झाला आणि आम्ही रवी शास्त्रींनाही त्यांचे सर्वोत्तम प्रयत्न करताना पाहिले. त्यामुळे तर खूप मजा आली आणि दिवसाची एक चांगली सुरुवात झाली. या मजेदार खेळाबाबत बोलताना रोहित म्हणाला की, 'हा खूप सोपा खेळ होता. मला वाटते सगळ्यांनी खूप चांगले काम केले. दिवसाची सुरुवात करण्याचा हा एक चांगला मार्ग वाटला. प्रत्येकाला सहभागी करून घेणे ही कल्पना होती आणि आम्ही थोडी मजाही केली.' भारत आणि इंग्लंड यांच्यातील कसोटी मालिका सुरू होण्यास अवघे काही तास उरले आहेत. 4 ऑगस्टला दोन्ही संघांमधील पहिला कसोटी सामना सुरू होईल. दोन्ही देशांमध्ये एकूण पाच कसोटी सामने खेळले जाणार आहेत. या पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेत कोणता संघ बाजी मारतो, याकडे सर्वांचे लक्ष लागलेले असेल.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3fqcyOS
No comments:
Post a Comment