हेडिंग्ले : भारताचा कर्णधार विराट कोहलीने दमदार फलंदाजी केली. पण या सामन्याच्या चौथ्या दिवशी कोहलीला इतिहास रचण्याची एक सुवर्णसंधी आहे. चौथ्या दिवशी कोहली एका अनोख्या विश्वविक्रमाला गवसणी घालू शकतो. विराटची बॅट गेल्या काही सामन्यांपासून शांत होती, पण तिसऱ्या दिवशी विराटची बॅट आता धावांनिशी बोलायला लागली आहे. त्यामुळे चौथ्या दिवशी विराटकडून मोठ्या अपेक्षा आहेत. त्यामुळे विराटने चौथ्या दिवशी अजून ५५ धावा फटकावल्या तर त्याला विश्वविक्रम रचण्याची एक नामी संधी आहे. या कसोटीत विराटने शतक केल्यास आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील त्याच्या शतकांची संख्या ७१ इतकी होईल. आतापर्यंत क्रिकेट विश्वात सर्वाधिक शतक झळकावणारा कर्णधार म्हणून कोहलीला इतिहास रचता येऊ शकतो. हा विश्वविक्रम यापूर्वी ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पॉन्टिंगच्या नावावर होता. पॉन्टिंगने ऑस्ट्रेलियाचे नेतृत्व करत असताना कसोटी क्रिकेटमध्ये ४१ शतकं झळकावली होती. कोहलीने या विक्रमाशी यापूर्वीच बरोबरी केली आहे. त्यामुळे कोहलीने आजच्या सामन्यात शतक झळकावलं तर त्याचे एक कर्णधार म्हणून ४२वे शतक असेल आणि त्याच्या नावावर हा विश्वविक्रम नोंदवला जाईल. पॉन्टिंगने कसोटीत ४१ तर वनडेत ३० शतक केली आहेत. तर विराटने कसोटीत २७ तर वनडेत ४३ शतक केली आहेत. कर्णधार म्हणून विराटला पॉन्टिंगचा विक्रम मागे टाकण्याची संधी आहे. पॉन्टिंगने कर्णधार म्हणून ४१ शतक केली आहे. तर विराटच्या नावावर देखील सध्या तितकीच शतक आहेत. पहिल्या कसोटीत विराटने शतक केल्यास तो रिकी पॉन्टिंगला मागे टाकेल. विराटने १८७ सामन्यात कर्णधार म्हणून ४१ शतक केली आहेत. तर पॉन्टिंगने ३२४ सामन्यात ४१ शतक केली होती. कोहलीने आपले अखेरचे शतक हे २०१९ साली झळकावले होते आणि तेदेखील बांगलादेशबरोबर. हे शतकही वनडे क्रिकेटमध्ये पूर्ण झाले होते. त्यामुळे कसोटी क्रिकेटमध्ये गेल्या २ वर्षांपासून तरी कोहलीला चांगला सूर गवसेलला दिसत नाही. त्याचबरोबर परदेशातील कसोटी सामन्यांमध्येही कोहली अपयशी ठरल्याचे पाहायला मिळत आहे.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3koywTO
No comments:
Post a Comment