हेडिंग्ले : पहिल्या दिवशी भारतीय संघ अपयशी ठरत असताना स्टेडियममधील इंग्लंडच्या प्रेक्षकांनी भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजला डिवचण्याचा प्रयत्न केला. पण सिराजने यावेळी या प्रेक्षकांनाही जशासं तसं उत्तर दिलं आहे. या गोष्टीचा व्हिडीओ क्रिकेट विश्वात आता चांगलाच व्हायरल झाला आहे. नेमकं घडलं तरी काय, पाहा...भारतीय फलंदाजांनंतर आज भारतीय गोलंदाजही अपयशी ठरले. त्यामुळे जेव्हा सिराज हा क्षेत्ररक्षण करण्यासाठी सीमारेषेजवळ जात होता, तेव्हा चाहत्यांनी सिराजला डिवचलं. इंग्लंडच्या प्रेक्षकांनी यावेळी सिराजला इंग्लंडची धावसंख्या विचारून त्याला खिजवण्याचा प्रयत्न केला. पण सिराज त्यावेळी शांत बसला नाही. सिराजने यावेळी प्रेक्षकांना तोडीस तोड उत्तर देत त्यांची चांगलीच जिरवल्याचे पाहायला मिळाले. सिराजने यावेळी प्रेक्षकांना १ आणि शून्य असे हातवारे करून दाखवले. भारतीय संघ अजूनही या मालिकेत १-० अशा आघाडीवर आहे, हे सिराजने प्रेक्षकांना दाखवले. भारतीय संघ पहिल्याच दिवशी पिछाडीवर...इंग्लंडच्या दोन्ही सलामीवीरांनी यावेळी धडाकेबाज खेळ केला. भारतीय गोलंदाजांचा चांगलाच समाचार त्यांनी घेतला. रॉरी बर्न्स आणि हसीब हमीद या दोघांनाही यावेळी अर्धशतक झळकावली आणि इंग्लंडला धडाकेबाज सुरुवात करून दिली. पहिल्या दिवसअखेर इंग्लंडने बिन बाद १२०अशी मजल मारली असून त्यांच्याकडे आता ४२ धावांची आघाडी आहे. त्यापूर्वी फलंदाजांनी हाराकिरी केल्यामुळे भारताचा पहिला डाव ७८ धावांमध्येच आटोपला. अँडरसनने यावेळी अचूक आणि भेदक मारा केला आणि कोहलीला बाद करत भारताला तिसरा धक्का दिला. त्यामुळे भारताची ११व्या षटकात ३ बाद २१ अशी अवस्था झाली होती. त्यानंतर काही काळ रोहित शर्मा आणि अजिंक्य रहाणे यांनी काही धावा जमवल्या. पण उपाहारापूर्वी अजिंक्य रहाणे १८ धावांवर बाद झाला. त्यानंतर रोहित शर्माकडून मोठी खेळीची भारतीय चाहत्यांना आशा होती. पण रोहितही यावेळी मोठी खेळी साकरण्यात अपयशी ठरला. रोहितने १०५ चेंडूंचा सामना केला खरा, पण त्याला एका चौकाराच्या मदतीने १९ धावाच करता आल्या. रोहित बाद झाला आणि भारताचा डाव कोसळला.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3jeAerJ
No comments:
Post a Comment