हेडिंग्ले : तिसरा कसोटीचा पहिलाच दिवस भारतासाठी वाईट ठरला. कारण फलंदाजांनी हाराकिरी केल्यामुळे भारताचा पहिला डाव ७८ धावांमध्येच आटोपला. त्यानंतर भारतीय गोलंदाजही अपयशी ठरल्याचे पाहायला मिळाले. त्यामुळे सामन्याच्या पहिल्याच दिवशी इंग्लंडने भारतावर दमदार आघाडी घेतली आहे. आता दुसऱ्या दिवशी दोन्ही संघ कसा खेळ करतात, यावर सामन्याचा निकाल अवलंबून असेल. भारताची वाईट सुरुवात ही आजच्या दिवसाच्या पहिल्या षटकापासूनच झाली. पहिल्याच षटकात अँडरसनने भारताचा सलामावीर लोकेश राहुलला बाद केले. भारताला पहिल्याच षटकात अँडरसनने हा धक्का दिला होता. त्याचबरोबर अँडरसनने त्यानंतर चेतेश्वर पुजाराला बाद करत भारताला दुसरा धक्का दिला. भारताने दोन्ही फलंदाज लवकर बाद झाल्यावर विराट कोहली आता कशी फलंदाजी करतो, याकडे सर्वांचे लक्ष लागलेले होते. पण अँडरसनने यावेळी अचूक आणि भेदक मारा केला आणि कोहलीला बाद करत भारताला तिसरा धक्का दिला. त्यामुळे भारताची ११व्या षटकात ३ बाद २१ अशी अवस्था झाली होती. त्यानंतर काही काळ रोहित शर्मा आणि अजिंक्य रहाणे यांनी काही धावा जमवल्या. पण उपाहारापूर्वी अजिंक्य रहाणे १८ धावांवर बाद झाला. त्यानंतर रोहित शर्माकडून मोठी खेळीची भारतीय चाहत्यांना आशा होती. पण रोहितही यावेळी मोठी खेळी साकरण्यात अपयशी ठरला. रोहितने १०५ चेंडूंचा सामना केला खरा, पण त्याला एका चौकाराच्या मदतीने १९ धावाच करता आल्या. रोहित बाद झाला आणि भारताचा डाव कोसळला. इंग्लंडकडून जेम्स अँडरसनने पहिल्या तीन फलंदाजांना बाद करत भारताचे कंबरडे मोडले. त्यानंतर क्रेग ओव्हर्टननेही तीन विकेट्स घेत भारताच्या फलंदाजीतील हवा काढून टाकली. इंग्लंडचे गोलंदाज यशस्वी ठरले असले तरी भारताच्या गोलंदाजांनी मात्र आज निराशा केली. इंग्लंडच्या दोन्ही सलामीवीरांनी यावेळी दमदार सुरुवात करत भारताच्या गोलंदाजीला निष्प्रभ केले. कारण या दोघांनी पहिल्याच दिवशी इंग्लंडसाठी शतकी सलामी दिली. भारतीय गोलंदाजांचा चांगलाच समाचार त्यांनी घेतला. रॉरी बर्न्स आणि हसीब हमीद या दोघांनाही यावेळी अर्धशतक झळकावली आणि इंग्लंडला धडाकेबाज सुरुवात करून दिली. पहिल्या दिवसअखेर इंग्लंडने बिन बाद १२०अशी मजल मारली असून त्यांच्याकडे आता ४२ धावांची आघाडी आहे.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3Bb2phh
No comments:
Post a Comment