नवी दिल्ली : भारत आणि इंग्लंड यांच्यातील तिसरा सामना आता काही तासांवर येऊन ठेपला आहे. या सामन्यासाठी भारतीय संघात दोन मोठे बदल होऊ शकतात, असे दिसत आहे. पहिला बदलभारतीय संघात पहिला बदल हा वेगवान गोलंदाजीमध्ये होऊ शकतो. कारण भारताचा वेगवान गोलंदाज शार्दुल ठाकूर हा आता पूर्णपणे फिट झाला आहे. शार्दुलने पहिल्या सामन्यात दमदार कामगिरी केली होती. पण दुसऱ्या कसोटीत त्याला दुखापतीमुळे खेळता आले नव्हते. शार्दुल हा एक चांगला वेगवान गोलंदाज तर आहेच, पण तो उपयुक्त फलंदाजीही करू शकतो. त्यामुळे भारतीय संघ त्याचा एक अष्टपैलू खेळाडू म्हणून विचार करत आहे. त्यामुळे शार्दुलचे भारतीय संघातील स्थान महत्वाचे आहे. त्यामुळे पहिल्या कसोटीतील कामगिरीच्या जोरावर शार्दुलला तिसऱ्या सामन्यात खेळण्याची संधी मिळण्याची आशा आहे. पण शार्दुलला संघात स्थान द्यायचे असेल तर त्यासाठी इशांत शर्माला संघातून वगळावे लागणार आहे. दुसरा बदलभारतीय संघातील अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजा हा पूर्णपणे फिट नसल्याचे दिसत आहे. त्याचबरोबर गेल्या दोन्ही कसोटी सामन्यांमध्ये जडेजाला चांगली कामगिरी करता आलेली नाही. त्यामुळे तिसऱ्या कसोटीसाठी भारतीय संघात जडेजाच्या जागी आर. अश्विनची निवड करण्यात येऊ शकते. कारण जेव्हा अश्विनला पहिल्या कसोटीमधून वगळले होते, तेव्हा सर्वांनाच धक्का बसला होता. अश्विनने इंग्लंडमध्येही आतापर्यंत चांगली कामगिरी केली असली तरी त्याला अजूनही या मालिकेत संधी मिळालेली नाही. पण तिसऱ्या कसोटी सामन्यात मात्र जडेजाच्या जागी आता अश्विनला संधी मिळण्याची दाट शक्यता आहे. तिसऱ्या कसोटी सामन्यासाठी अजून एक बदल करायचा झाला तर सूर्यकुमार यादवला भारतीय संघात स्थान मिळू शकते. पण सूर्यकुमारला संघात स्थान द्यायचे असेल तर कोणाला वगळायचे, हा मोठा प्रश्न भारतीय संघापुढे असेल. पण सूर्यकुमारला खेळवण्याचा भारतीय संघाचा निर्णय झाला असेल तर कदाचित चेतेश्वर पुजाराला एका सामन्यासाठी विश्रांती देण्यात येऊ शकते.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3gr6B4t
No comments:
Post a Comment