नवी दिल्ली: भारत आणि इंग्लंड यांच्यात हेडिंग्ले (लीड्स) मैदानावर तिसरा कसोटी सामना होणार आहे. या मैदानावर दोन्ही संघात १९ वर्षानंतर प्रथमच कसोटी लढत होत आहे. याआधी २००२ साली सौरव गांगुलीच्या नेतृत्वाखाली भारताने तर नासिर हुसैनच्या नेतृत्वाखाली इंग्लंडचा संघ मैदानात उतरला होता. त्या सामन्यात भारताने शानदार कामगिरी केली होती आणि सामना एक डाव आणि ४६ धावांनी जिंकला होता. भारतीय फलंदाज आणि गोलंदाजांनी केलेल्या धमाकेदार कामगिरीमुळे इंग्लंडचा पराभव झाला होता जो त्यांना आज देखील विसरता आला नाही. वाचा- २००२ साली झालेल्या कसोटी सामन्यात भारताने टॉस जिंकून फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. पहिल्या डावात संजय बांगर ६८ तर विरेंद्र सेहवाग ८ धावांवर बाद झाले. त्यानंतर राहुल द्रविडने १४८ तर सचिन तेंडुलकरने १९३ धावांची शतकी खेळी केली. या दोघांच्या शतकानंतर कर्णधार सौरव गांगुलीने १२८ धावा करत भारताला ६२८ धावांपर्यंत मजल मारून दिली. वाचा- धावांचा डोंगर उभा केल्यानंतर भारतीय गोलंदाजांनी विजयाचा कळस चढवला. इंग्लंडचा पहिला डावा २७३ धावा संपुष्ठात आला. पहिल्या डावात अनिल कुंबळे आणि हरभजन सिंग यांनी प्रत्येकी ३ तर जहीर खान आणि अजीत आगरकर यांनी प्रत्येकी २ विकेट घेतल्या. भारताने इंग्लंडला फॉलोऑन दिला दुसऱ्या डावात देखील इंग्लंडचा डाव गडगडला. कर्णधार हुसैनने ११० धावा केल्या पण त्याला पराभव रोखता आला नाही. दुसऱ्या डावात कुंबळेने ४, बांगरने २ तर जहीर, आगरकर आणि हरभजन यांनी प्रत्येकी एक घेतली. भारताने या सामन्यात ऐतिहासिक असा विजय मिळवला. वाचा- आता भारतीय संघ विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली इंग्लंडविरुद्ध या मैदानावर लढणार आहे. या मैदानावर भारताला गेल्या ५३ वर्षात पराभव स्विकारावा लागला नाही. पण सध्याच्या भारतीय संघातील एकाही खेळाडूंना या मैदानावर कसोटी सामना खेळला नाही. वाचा-
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3z9BHVz
No comments:
Post a Comment