अबु धाबी: करोना व्हायरसविरुद्ध संपूर्ण जग लढत आहे. अशा महासंकट काळात क्रिकेट चाहत्यांच्या चेहऱ्यावर आनंद देणारी आयपीएल स्पर्धा आजपासून सुरू होत आहे. या स्पर्धेत पुन्हा एकदा दिग्गज महेंद्र सिंह धोनी, विराट कोहली आणि रोहित शर्मा हे कर्णधार जेतेपदासाठी मैदानात उतरतील. सर्वांची नजर असेल तरी रोहित शर्माच्या आणि महेंद्र सिंह धोनीच्या यांच्या पहिल्या लढतीवर. भारतात सातत्याने करोना रुग्णांची संख्या वाढत असल्यामुळे ही स्पर्धा युएईमध्ये खेळवली जात आहे. IPLच्या इतिहासात प्रथम प्रेक्षकांशिवाय संपूर्ण स्पर्धा होणार आहे. या काळात चित्रपट आणि क्रिकेट चाहत्यांसाठी आयपीएल खास अशी ठरणार आहे. वाचा- सर्व जण सोशल डिस्टसिंग आणि आरोग्याशी संबंधित नियमांचे पालन करत आहेत अशात पुढील ५३ दिवस जैव सुरक्षित वातावरणात धोनीची चेन्नई, कोहलीची बेंगळुरू रोहितीच मुंबई, केएल राहुलची पंजाब आणि श्रेयस अय्यरची दिल्लीसह आठ संघ आयपीएलचे सामने खेळतील. वाचा- याआधी देखील आयपीएलचे सामने विदेशमध्ये झाले आहेत. पण काही कोटी डॉलरची ही स्पर्धा प्रथमच पूर्णपणे विदेशात होत आहे. या वर्षी ख्रिस गेल आणि डेव्हिड वॉर्नर सारख्या आक्रमक फलंदाजांच्या षटाकरांना टाळ्या वाजवण्यासाठी प्रेक्षक मात्र नसतील. पण असे असले तरी यावर कोणाची तक्रार नाही. किमान सामना खेळता येईल आणि पाहता येईल हीच दोघांची भावना आहे. वाचा- कागदावरील रिपोर्टपाहता मुंबईचा संघ सर्वात मजूबत दिसत आहे. रोहित सोबत हार्दिक, क्रुणाल पांड्या, पोलार्ड आणि डेथ ओव्हरचा बादशाह जसप्रीत बुमराह त्याच्याकडे आहे. याउलट चेन्नईचा संघ हा भलेही म्हाताऱ्यांची फैज वाटत असला तरी त्यांनी मिळवलेले यश नजआड करता येणार नाही. शेन वॉट्सन, ड्वेन ब्रावो, फाफ डु प्लेसिस आणि जडेजा सारखे खेळाडू त्यांच्याकडे आहेत. सोबत कॅप्टन कुल धोनीची साथ आहेच. पण या वर्षी चेन्नईकडून सुरेश रैना, हरभजन सिंग हे दोन खेळाडू नाहीत. तर पहिल्या सामन्यासाठी रैनाच्या ऐवजी ऋतुराज गायकवाड देखील करोना पॉझिटिव्ह असल्यामुळे उपलब्ध नसेल. वाचा- चेन्नईचा संघ आयपीएलमधील सर्वात अनुभवी खेळाडू आहे. या संघातील खेळाडूंनी एकूम ३ हजार ८४० टी-२० सामने खेळेल आहेत. पण यातील अनेक खेळाडूंनी केल्या काही महिन्यांपासून क्रिकेट खेळले नाही. खुद्द धोनी एका वर्षानंतर मैदानात उतरतोय. संघातील सात खेळाडूंनी २०२० मध्ये एकही सामना खेळला नाही. याआधी २०१४मध्ये युएईत IPLचे काही सामने झाले होते. तेव्हा चेन्नईने ५ पैकी ४ सामने जिंकले होते. तर मुंबईला पाच पैकी एकही सामना जिंकता आला नव्हता. मुंबईचा संघ विक्रमी पाचवे विजेतेपद मिळवण्यासाठी मैदानात उतरेल तर चेन्नईचा संघ मुंबईच्या विक्रमाशी बरोबरी करण्याचा प्रयत्न करेल. आयपीएलच्या इतिहासात चेन्नई संघाने नेहमी प्लेऑफमध्ये प्रवेश केला. ते या स्पर्धेचे पाच वेळा उपविजेते ठरले आहेत. २०१६ आणि १७ या दोन वर्षांसाठी त्यांच्यावर बंदी घातली होती. त्यानंतर २०१८ साली शानदार कामगिरी करत विजेतेपद मिळवले. वाचा- दोन्ही संघात आतापर्यंत २८ सामने झाले आहेत. त्यापैकी चेन्नई संघाने ११ तर मुंबई संघाने १७ सामने जिंकले आहेत. त्यामुळे चेन्नईवर दबाव अधिक असेल. असा असेल संभाव्य संघ- मुंबई इंडियन्स- रोहित शर्मा (कर्णधार), क्विंटन डिकॉक(विकेटकिपर), इशान किशन, सुर्यकुमार यादव, हार्दिक पांड्या, किरॉन पोलार्ड, क्रुणाल पांड्या, नाथन कुल्टर नाइल राहुल चाहर, जसप्रित बुमराह आणि ट्रेंट बोल्ट चेन्नई सुपर किंग्ज- महेंद्र सिंह धोनी (कर्णधार आणि विकेटकिपर), शेन वॉट्सन, अंबाती रायडू, फाफ डुप्लिसिस, केदार जाधव, रविंद्र जडेजा, ड्वेन ब्रावो, शार्दुल ठाकूर, पीयुष चावला, दीपक चाहर आणि इमरान ताहिर.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3iKnGWd
No comments:
Post a Comment