Ads

Sunday, September 20, 2020

IPL 2020: दोन कर्णधार आणि दोन प्रशिक्षकांमधील लढत Delhi Vs Punjab Today Match

दुबई: आयपीएलच्या १३व्या हंगामातील दुसरी लढत आज (रविवारी) () यांच्यात होणार आहे. या दोन्ही संघांना आतापर्यंत एकदाही आयपीएलचे विजेतेपद मिळवले नाही. त्यामुळे दोन्ही संघ यावर्षी सर्वोत्तम कामगिरी करण्याचा प्रयत्न करतील. स्पर्धेत आतापर्यंत या दोन्ही संघांमध्ये २४ लढती झाल्या आहेत. त्यापैकी १४ सामन्यात पंजाबने तर १० सामन्यात दिल्लीने विजय मिळवला आहे. या वर्षी पंजाबचे नेतृत्व केएल राहुल करणार आहे. तर दिल्लीचे नेतृत्व श्रेयस अय्यरकडे असणार आहे. दोन्ही नवे कर्णधार आहेत आणि या वर्षी काय प्रयोग करतात याकडे सर्वांचे लक्ष असेल. वाचा- गेल्या वर्षी दिल्ली संघ प्लेऑफमध्ये पोहोचलला होता. पंजाब संघाने गेल्या तीन हंगामात पहिल्या सामन्यात विजय मिळवला आहे. हीच कामगिरी पुन्हा एकदा करण्यास ते उत्सुक असतील. दिल्ली संघाकडे फिरकीपटूंची फौज आहे. हे फिरकीपटू पंजाब संघाला अडचणी आणू शकतात. आर.अश्विन, अमित मिश्रा, अक्षर पटेल हे अनुभवी फिरकीपटू आहेत. हे तिन्ही गोलंदाज पंजाबची डोकेदुखी ठरू शकतात. वाचा- या सामन्यात आणखी एक लढत पाहायला मिळणार आहे. ती म्हणजे कर्णधार केएल राहुल आणि श्रेयस अय्यर यांच्यातील लढत होय. या दोघांकडे भविष्यातील भारतीय क्रिकेट संघाचे कर्णधार म्हणून पाहिले जात आहे. फक्त कर्णधार नाही तर दोन्ही संघांचे कोच देखील या वर्षी चर्चेत आहेत. पंजाबला अनिल कुंबळेचे तर दिल्लीला रिकी पॉटिंगचे मार्गदर्शन असणार आहे. दोन्ही संघात मोठे शॉट खेळणारे खेळाडू आहेत. पण युएईमधील धीम्या खेळपट्टीवर अश्विन, मिश्रा आणि अक्षर ही जोडी पंजाबवर नियंत्रण ठेवू शकते. दिल्ली संघात पृथ्वी शॉ, अय्यर, ऋषभ पंत, शिखर धवन, शिमरोन हेटमायर असे आक्रमक फलंदाज आहेत. त्यामुळे कदाचित भारतीय कसोटी संघाचा उपकर्णधार अजिंक्य रहाणेला संधी मिळण्याची शक्यता नाही. त्याचा स्ट्राइक रेट १२० पेक्षा कमी आहे. दिल्लीच्या गोलंदाजांमध्ये कासिसो रबाडा, इशांत शर्मा आणि डॅनिअल सॅम्स सारखे खेळाडू आहेत. वाचा- पंजाबचा विचार केला तर सर्वाधिक षटकार मारणारा ख्रिस गेल आणि ग्लेन मॅक्सवेल सारखे धडाकेबाज फलंदाज आहेत. त्यांच्या सोबतीला केएल राहुल सारखा फलंदाज आहे. मॅक्सवेलने नुकतीच इंग्लंडविरुद्ध तिसऱ्या वनडेत १०८ धावांची विजयी खेळी केली होती. त्यामुळे त्याचा आत्मविश्वास नक्कीच वाढला असेल. २०१४साली युएईमध्ये झालेल्या स्पर्धेत मॅक्सवेलने १६ सामन्यात ५५२ धावा केल्या होत्या. गेल आणि राहुल नंतर मयंक अग्रवाल देखील भरवश्याचा फलंदाज आहे. गोलंदाजीच भारताचा अनुभवी मोहम्मद शमी पंजाबची मोठी ताकद ठरू शकतो तर फिरकीची जबाबदारी अफगाणिस्तानचा मुजीन जदरानवर असेल. सामन्याची वेळ- भारतीय वेळेनुसार संध्याकाळी ७.३० वाजता कुठे पाहाल- स्टार नेटवर्क ऑनलाइन स्ट्रीमिंग (Live Streaming of Delhi Capitals and Kings XI Punjab match)हॉटस्टार


from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/2HbRRrr

No comments:

Post a Comment

BJP’s Rajya Sabha strength falls below 100; may rise soon

A month after touching the mark of 100 seats for the first time in Rajya Sabha, BJP’s numerical strength has come down to 95 as five of its ...