नवी दिल्ली: भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीची पत्नी अभिनेत्री अनुष्का शर्माच्या वाढदिवसा निमित्ताने अनेकांनी शुभेच्छा दिल्या. विराटने अनुष्कासोबतचा एक फोटो शेअर करून वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. अनुष्काला भारतीय संघातील अन्य खेळाडूंनी देखील शुभेच्छा दिल्या. यातील युवराज सिंगने दिलेल्या शुभेच्छांची चर्चा सोशल मीडियावर होत आहे. वाचा- युवीने अनुष्काला शुभेच्छा देताना रोझी असा शब्द वापरला. २०११च्या वर्ल्ड कप विजेत्या संघाचा हिरो असलेला युवराज म्हणतो, हॅपी बर्थडे रोझी भाभी; यश, आनंद आणि आरोग्यासाठी शुभेच्छा. आरोग्यदायी आणि आनंदी रहा. वाचा- युवराजने याआधी देखील अनेक वेळा सोशल मीडियावर अनुष्काला रोझी या नावाने टॅग केले. बॉम्बे वेलवेट चित्रपटात अनुष्काने साकारलेल्या व्यक्तीरेषेचे नाव रोझी होते. वाचा- करोना व्हायरसमुळे संपूर्ण देशात लॉकडाऊन जाहीर केले आहे. देशात लॉकडाऊनचा कालावधी १७ मे पर्यंत वाढवण्यात आला आहे. क्रिकेट विश्वातील सर्वजण घरीच कुटुंबासोबत थांबले आहेत. विराट आणि अनुष्का यांनी काल घरीच वाढदिवस साजरा केला. पाहा- करोनामुळे आयपीएल स्पर्धा अनिश्चित काळासाठी स्थगित करण्यात आली आहे. आता ऑस्ट्रेलियात टी-२० वर्ल्ड कप स्पर्धा होणार आहे. त्याआधी करोना व्हायरस संकट कमी झाले तर भारतीय संघाला सामने खेळता येतील. अनुष्काबाबत बोलायचे तर २०१८ मधील झिरो चित्रपटानंतर तिचा एकही चित्रपट प्रदर्शित झालेला नाही.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/2SsJbQy
No comments:
Post a Comment