नवी दिल्ली: क्रिकेटमधील दिग्गज फलंदाजांच्या यादीत आघाडीवर असलेले नाव म्हणजे वेस्ट इंडिजचा ब्रायन चार्ल्स लारा होय. लारा आज त्याचा ५१वा वाढदिवस साजरा करत आहे. वनडे आणि कसोटीत प्रत्येकी १० हजार धावा करणाऱ्या लाराने अनेक विक्रमी आणि शानदार खेळी केल्या आहेत. वाढदिवसानिमित्ताने जाणून घेऊयात त्याचे खास विक्रम... वाचा- लाराच्या नावावर कसोटी क्रिकेटमध्ये एका डावात सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम आहे. १६ वर्षांपूर्वी लाराने इंग्लंडविरुद्ध नाबाद ४०० धावांची खेळी केली होती. कसोटी क्रिकेटच्या इतिहासातील ही सर्वोच्च खेळी आहे. गेल्या १६ वर्षात लाराच्या या विक्रमाच्या जवळपासही कोणी पोहोचू शकले नाही. वाचा- लाराने कसोटीत ४०० धावा करण्याआधी १९९४ मध्ये इंग्लंडविरुद्धच ३७५ धावा केल्या होत्या. तेव्हा लाराचे वय फक्त २५ वर्ष होते. त्यानंतर १० वर्षांनी ऑस्ट्रेलियाच्या मॅथ्य़ू हेडन याने झिम्बाब्वेविरुद्ध ३८० धावा करून लाराचा विक्रम मागे टाकला होता. १९९५ मध्ये लाराने श्रीलंकेविरुद्ध शारजाह येथे वनडेत अशी शानदार खेळी केली होती. लाराने या सामन्यात १६९ धावा केल्या होत्या आणि श्रीलंकेसमोर ३३४ धावांचे विशाल लक्ष्य ठेवले होते. वाचा- लाराचा कसोटीमधील सर्वाधिक धावाचा विक्रम हेडनने मोडला होता. पण फक्त सहा महिन्यात लाराने सेंट जॉन्स मैदानावर इंग्लंडविरुद्ध कसोटीमधील एक विक्रमी खेळी केली. या सामन्यात लाराला बाद करण्याचा इंग्लंडने हवे ते प्रयत्न केले पण त्यांना शक्य झाले नाही. लाराने ४३ चौकार आणि ४ षटकारांच्या मदतीने नाबाद ४०० धावा केल्या. कसोटी क्रिकेटमधील ही सर्वोच्च धावसंख्या आहे. लाराची धावांची भूक काही कमी नव्हती. तो एकदा सेट झाली की गोलंदाज आणि फलंदाजांचे काही खरे नसते. ६ जून १९९४ रोजी लाराने एका प्रथम श्रेणी सामन्यात वार्विकशायर विरुद्ध ५०१ धावा केल्या. लाराने ४२७ सामन्यात ६२ चौकार आणि १० षटकारांसह ही खेळी केली. यासह त्याने पाकिस्तानच्या हनीफ मोहम्मदचा ४९९ धावांचा विक्रम मोडला होता. नाबाद ५०१ धावांची खेळी केल्यानंतर या दिग्गज फलंदाज म्हणाला की, मला वाटत नाही मी एक महान फलंदाज आहे. पण विक्रम करण्यास आवडते. असे अनेक फलंदाज आहे जे माझ्या पुढे आहेत.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/2zQmfnM
No comments:
Post a Comment