शारजा : मुंबई इंडियन्सला पराभवानंतर आता अजून एक मोठा धक्का बसला आहे. त्यामुळे मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्माची चिंता आता आणखीनच वाढली आहे. मुंबईवर सग तीन सामन्यांमध्ये पराभूत होण्याची नामुष्की ओढवली. पण मुंबईला आरसीबीच्या पराभवानंतर मोठा धक्का बसला आहे. या पराभवानंतर मुंबई इंडियन्सचा संघ गुणतालिकेत चक्क सातव्या स्थानावर फेकला गेला आहे. या पराभवानंतर मुंबई इंडियन्सचे १० सामने झाले आहेत. या १० सामन्यांमध्ये मुंबई इंडिन्सला सहा लढतींमध्ये पराभव पत्करावा लागला आहे, तर चार विजय त्यांच्या गाठिशी आहेत. त्यामुळे मुंबई इंडियन्सचे आता आठ गुण असून रनरेटमध्येही ते मागे आहेत. त्यामुळे मुंबई इंडियन्सच्या संघाची आता सातव्या स्थानावर घसरण झाली आहे, आतापर्यंत मुंबई इंडियन्सचा संघ एवढ्या खालच्या स्थानावर कधीही पाहायला मिळाला नव्हता. गुणतालिकेत सातव्या स्थानावर गेल्यामुळे कर्णधार रोहितची चिंता वाढली आहे. कारण आता त्यांना जर प्ले-ऑफमध्ये पोहोचायचे असेल तर त्यांना चारही सामने मोठ्या फरकाने जिंकावे लागणार आहेत. तीन सामने पराभूत झाल्यावर मुंबईचा संघ सलग चार सामने कसे काय जिंकणार, याचे टेंशन आता रोहितला आले असेल. मुंबईला बाद फेरीत पोहोचण्यासाठी चारही सामने जिंकावे लागतील, त्याचबरोबर त्यांना रनरेट सुधारण्यासाठी फक्त विजय मिळवून चालणार नाही तर त्यांना मोठ्या फरकाने हे सामने जिंकावे लागतील, तरच त्यांची प्ले-ऑफमध्ये पोहोचण्याची आशा जीवंत राहू शकते. अन्यथा मुंबई इंडियन्सचा संघ या आयपीएलमधून बाहेर पडू शकतो. त्यामुळे मुंबई इंडियन्ससाठी ही एक मोठी धोक्याची घंटा आहे. त्यामुळे मुंबईला उर्वरीत चारही सामने मोठ्या फरकाने आता जिंकावे लागणार आहेत. त्याचबरोबर अन्य संघांची कशी कामगिरी होते, यावर मुंबईचा संघ प्ले-ऑफमध्ये पोहोचणार की नाही, हे समजू शकणार आहे. दुसरीकडे आरसीबीच्या संघाने या सामन्यात दमदार विजय मिळवला आहे. या सामन्यातील विजयामुळे आरसीबीचे आता १२ गुण झाले आहेत आणि प्ले-ऑफमध्ये पोहोचण्यासाठी त्यांनी आता एक मोठे पाऊल पुढे टाकल्याचे पाहायला मिळत आहे.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/2ZnQsan
No comments:
Post a Comment