Ads

Friday, September 24, 2021

IPL 2021 Latest Points Table: अव्वल स्थान आमचेच; IPLगुणतक्त्यात झाला मोठा फेरबदल

शारजाह: युएईमध्ये सुरू असलेल्या आयपीएल २०२१च्या दुसऱ्या सत्रात शुक्रवारी झालेल्या सामन्यानंतर गुणतक्त्यात मोठा फेरबदल झाला आहे. शुक्रवारी झालेल्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्जने रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूचा ६ विकेटनी पराभव केला. या सत्रातील चेन्नईचा सलग दुसरा विजय आणि बेंगळुरूचा सलग दुसरा पराभव ठरला आहे. जाणून घेऊयात या सामन्यानंतर गुणतक्त्यात कसा बदल झालाय तो... वाचा- चेन्नईने आरसीबीवर मिळवलेल्या विजयामुळे त्यांनी पुन्हा एकदा अव्वल स्थान मिळवले आहे. चेन्नईचे ९ सामन्यातील ७ विजयासह १४ गुण झाले आहे. याआधी अव्वल स्थानी असलेल्या दिल्ली कॅपिटल्सला चेन्नईने मागे टाकले. दिल्लीचे देखील १४ गुण आहेत पण चेन्नईचे नेट रनरेट सर्वाधिक म्हणजे प्लस १.१८५ इतके आहे. तर दिल्लीचे प्लस ०.६१३ इतके आहे. वाचा- आजच्या पराभवामुळे रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूच्या गुणतक्त्यातील स्थानात फरक पडलेला नाही. ते ९ पैकी ५ विजयासह तिसऱ्या स्थानावर कायम आहेत. पण त्यांचे नेट रनरेट वजा ०.७२० इतके झाले आहे आणि प्ले ऑफमध्ये पोहोचण्यासाठी त्यांना पुढील ५ पैकी ३ लढती जिंकाव्या लागतील. चेन्नई आणि दिल्ली या संघांसाठी पुढील पाच पैकी एका लढतीतील विजय प्ले ऑफमधील स्थान निश्चित करण्यासाठी पुरेसा ठरू शकतो. वाचा- गुणतक्त्यात केकेआर ८ गुणांसह (नेट रनरेट प्लस ०.३६३) चौथ्या, राजस्थान रॉयल्स ८ गुणांसह(नेट रनरेट वजा ०.१५४) पाचव्या, मुंबई इंडियन्स ८ गुणांसह (नेट रनरेट वजा ०.३१०) सहाव्या, पंजाब किंग्ज ६ गुणांसह सातव्या तर सनरायझर्स हैदराबाद २ गुणांसह अखेरच्या स्थानावर आहे. वाचा- सर्वाधिक धावा- ४२२,शिखर धवन (दिल्ली कॅपिटल्स)सर्वाधिक विकेट- १९, हर्षल पटेल (रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू)


from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3u7I7Dc

No comments:

Post a Comment

BJP’s Rajya Sabha strength falls below 100; may rise soon

A month after touching the mark of 100 seats for the first time in Rajya Sabha, BJP’s numerical strength has come down to 95 as five of its ...