आबुधाबी : मुंबई इंडियन्सला चेन्नईनंत केकेआरकडूनही पराभव पत्करावा लागला. केकेआरविरुद्धच्या सामन्यात मुंबईचा संघ का पराभूत झाला, याचे सर्वात मोठे कारण कर्णधार रोहित शर्माने सामना संपल्यावर सांगितले. मुंबई इंडियन्सच्या पराभवाचे कारण आहे तरी काय, पाहा...रोहित शर्माने सांगितले की, " आजच्या सामन्याची जी खेळपट्टी होती ती फलंदाजीसाठी चांगली होती. मी आणि क्विंटन डीकॉक यांनी संघाचा चांगली सुरुवात करून दिली. जेव्हा एखाद्या संघाला चांगली सुरुवात मिळते तेव्हा त्यांच्याकडून मोठ्या धावसंख्येची अपेक्षा असते. पण या सामन्यात आमट्याकडून तसे झाले नाही. कारण चांगली सलामी मिळाल्यावर एकही मोठी भागीदारी पाहायला मिळाली नाही आणि या गोष्टीचाच फटका आम्हाला बसला. कारण या खेळपट्टीवर १५६ हे टार्गेट जिंकण्यासाठी मोठे नव्हते. त्यामुळे आम्हाला गोलंदाजीवर जास्त भर द्यावा लागेल, हे पहिल्या डावानंतर आम्हाला समजले होते. त्यामुळे आम्हाला चांगली सलामी मिळूनही मोठी धावसंख्या उभारता आली नाही, ही मोठी चुक घडली. पण यामधून नक्कीच धडा आम्ही घेणार आहोत. त्यामुळे या पराभवातून नक्कीच आम्हाला बरेच काही शिकण्यासारखे आहे. त्यामुळे यापुढील सामन्यांमध्ये आम्ही या चुकांमधून शिकण्याचा प्रयत्न करू." रोहित शर्माने पुढे सांगितले की, " जेव्हा आमच्या १५५ धावा झाल्या होत्या, तेव्हा चांगली गोलंदाजी करणे हे आमचे काम होते. पण पहिल्या काही षटकांमध्ये आमच्याकडून चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली. नाही. त्यामुळे आम्हाला सामन्यावर पकड मिळवता आली नाही. चांगली सुरुवात झाल्यावरही मोठी धावसंख्या आम्हाला उभारता आली नाही. आमच्याकडून मधल्या फळीत मोठ्या भागीदाऱ्या व्हायला हव्या होत्या, पण तसे घडले नाही." गुणतालिकेतील स्थानाबद्दल रोहित शर्मा म्हणाला की, " आयपीएलचे सामने खेळत असताना गुणतालिकेत काय फरक पडेल, हे डोक्यात असते. सध्याच्या घडीला आम्ही वाईट स्थानी नाही. त्यामुळे अजूनही बरेच सामने बाकी आहे आणि यापूर्वीही आम्ही चांगले पुनरागमन करू दाखवले आहे. "
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3EJL7KJ
No comments:
Post a Comment