मुंबई: नोव्हेंबर २०२१ ते जून २०२२ या कालावधीत आपल्या घरच्या मैदानांवर चार कसोटी, १४ टी-२० आणि तीन वन-डे लढती खेळणार आहे. भारतीय क्रिकेट बोर्डाने (बीसीसीआयने) जाहीर केलेल्या कार्यक्रमानुसार आठ महिन्यांच्या या कालावधीत न्यूझीलंड (नोव्हेंबर-डिसेंबर), वेस्ट इंडिज (फेब्रुवारी २०२२), श्रीलंका (फेब्रुवारी-मार्च २०२२) आणि दक्षिण आफ्रिका (जून २०२२) हे संघ भारत दौऱ्यावर येणार आहेत. यादरम्यान एप्रिल-मे या कालावधीत इंडियन प्रीमियर लीगचे (आयपीएल) आयोजन होईल. वाचा- पुढील वर्षी ऑस्ट्रेलियात पुन्हा टी-२० वर्ल्ड कपचे आयोजन होत असल्याने टी-२० लढतींचे आयोजन अधिक होते आहे. त्यामुळे या कालावधीतील टीम इंडियाच्या वन-डेंची संख्या अवघी तीन आहे, असे बीसीसीआयशी संबंधित सूत्राने सांगितले. वाचा- ... भारत वि. न्यूझीलंड १७ नोव्हेंबर- पहिली टी-२०, जयपूर १९ नोव्हेंबर- दुसरी टी-२०, रांची २१ नोव्हेंबर-तिसरी टी-२०, कोलकाता २५ ते २९ नोव्हेंबर - पहिली कसोटी, कानपूर ३ ते ७ डिसेंबर- दुसरी कसोटी, मुंबई वाचा- भारत वि. विंडीज ६ फेब्रुवारी- पहिली वन-डे, अहमदाबाद. ९ फेब्रुवारी- दुसरी वन-डे, जयपूर १२ फेब्रुवारी- तिसरी वन-डे, कोलकाता १५ फेब्रुवारी- पहिली टी-२०, कटक १८ फेब्रुवारी- दुसरी टी-२०, विशाखापट्टण २० फेब्रुवारी- तिसरी टी-२०, त्रिवेंद्रम भारत वि. श्रीलंका २५ फेब्रुवारी ते १ मार्च- पहिली कसोटी, बेंगळुरू ५ मार्च ते ९ मार्च- दुसरी कसोटी, मोहाली १३ मार्च- पहिली टी-२०, मोहाली १५ मार्च- दुसरी टी-२०, धरमशाला १८ मार्च- तिसरी टी-२०, लखनौ भारत वि. द. आफ्रिका ९ जून- पहिली टी-२०, चेन्नई १२ जून- दुसरी टी-२०, बेंगळुरू १४ जून- तिसरी टी-२०, नागपूर १७ जून- चौथी टी-२०, राजकोट १९ जून- पाचवी टी-२०, दिल्ली
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3nQzHyK
No comments:
Post a Comment