दुबई: करोना व्हायरसमुळे थांबलेले क्रिकेट पुन्हा एकदा सुरू झाले. इंग्लंड आणि यांच्यात पहिला कसोटी सामना नुकताच पार पडला. या सामन्यात वेस्ट इंडिजने चार गडी राखून विजय मिळवला आणि मालिकेत १-० अशी आघाडी घेतली. पहिल्या कसोटी सामन्यात सर्वाधिक कौतुक कोणाचे झाले असेल तर वेस्ट इंडिजच्या याचे होय. या सामन्यानंतर आयसीसीने कसोटी क्रमवारी जाहीर केली. या क्रमवारीत होल्डरने अशी कामगिरी केली आहे जी गेल्या २० वर्षात कोणत्याही वेस्ट इंडिजच्या गोलंदाजाला करता आली नाही. आयसीसीच्या कसोटी क्रमवारीत गोलंदाजांमध्ये होल्डर दुसऱ्या स्थानवर पोहोचला आहे. करिअरमधील हे त्याचे सर्वोच्च स्थान असून वेस्ट इंडिजद्वारे गेल्या २० वर्षात कोणत्याही गोलंदाजाला क्रमवारीत दुसऱ्या स्थानावर पोहोचता आले नाही. वाचा- होल्डरने पहिल्या डावात ४२ धावा देत ६ विकेट घेतल्या. तर दुसऱ्या डावात एक विकेट घेतली. क्रमवारीत होल्डरने ८६२ गुणांसह दुसरे स्थान मिळवले. याआधी ऑगस्ट २००० साली कर्टनी वॉल्शने क्रमवारीत ८६६ गुण मिळवले होते. या क्रमवाती पहिल्या दहा जणांमध्ये फक्त एक भारतीय गोलंदाज आहे. भारताचा जलद गोलंदाज जसप्रित बुमराह सातव्या स्थानावर आहे. वाचा- पहिल्या कसोटीनंतर फलंदाजांच्या क्रमवारीत होल्डर ३५व्या स्थानावर कायम आहे. तर अष्ठपैलूंच्या क्रमवारीत ४८५ गुणांसह पहिल्या स्थानावर आहे. अष्ठपैलूंच्या क्रमवारीत इंग्लंडचा ४३१ गुणंसह दुसऱ्या स्थानावर आहे. स्टोक्सने पहिल्या कसोटीत ४३ आणि ४६ धावा केल्या होत्या फलंदाजांच्या क्रमवारीत तो नवव्या स्थानावर आहे. वाचा- करोना व्हायरसमुळे मार्च महिन्यापासून मैदानावर न उतरलेल्या भारतीय खेळाडूंनी फलंदाजी आणि गोलंदाजांच्या पहिल्या १० मध्ये स्थान मिळवले आहे. कर्णधार विराट कोहली फलंदाजांच्या यादीत पहिल्या स्थानावर कायम आहे. तर दुसऱ्या स्थानावर स्टीव्ह स्मिथ आहे. भारताचा चेतेश्वर पुजारा आणि अजिंक्य रहाणे अनुक्रमे ७व्या आणि ९व्या स्थानावर आहेत. वाचा- वेस्ट इंडिजविरुद्ध सहा विकेट घेतल्याने गोलंदाजांच्या क्रमवारीत स्टोक्स २३व्या स्थानावर पोहोचला आहे. सलामीवीर रोरी बर्न्सने ३० आणि ४२ धावांच्या जोरावर पहिल्या ३० मध्ये स्थान मिळवले. दुसऱ्या डावात ९५ धावा करून वेस्ट इंडिजच्या विजयात महत्त्वाची भूमिका पार पाडणाऱ्या जर्मेन ब्लॅकवूड ५८ व्या स्थानवर पोहोचला आहे.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/2CCtOQ6
No comments:
Post a Comment