मुंबई: सोशल मीडियावर आज सर्व जण एका भारतीय क्रिकेटपटूचे आभार मानत आहे. आता तुम्हाला वाटेल की, सध्या क्रिकेट सामने सुरू नाहीत तरी संबंधित खेळाडूचे आभार का मानले जात आहेत. तर आजच्या दिवशी म्हणजे २३ जून रोजी १३ वर्षपूर्वी भारताच्या अर्थात रोहित शर्माने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. टीम इंडियाकडून रोहितने पहिला आंतरराष्ट्रीय सामना खेळला होता. क्रिकेटमधील या शानदार १३ वर्षाबद्दल सर्व चाहते रोहितला धन्यवाद देत आहेत. सोशल मीडियावर #13YearsOfHITMAN हा हॅशटॅग टॉप ट्रेंडिगमध्ये आहे. वाचा- रोहित शर्माने राहुल द्रवीडच्या नेतृत्वाखाली २००७ मध्ये पहिला सामना खेळला होता. आयर्लंडविरुद्ध बेलफास्ट येथे झालेल्या वनडे सामन्यात रोहितला अंतिम ११ जणांच्यात स्थान मिळाले होते. पण या सामन्यात त्याला फलंदाजी करण्याची संधी मिळाली नाही. भारताने या सामन्यात ९ विकेटनी विजय मिळवला होता. पाहा- पदार्पण केल्यानंतर तीन दिवसांनी दुसऱ्या सामन्यात रोहितला पहिल्यांदा फलंदाजी करण्याची संधी मिळाली. हा सामना देखील बेलफास्ट येथे झाला. पण विरोधी संघ होता दक्षिण आफ्रिका. रोहितने या सामन्यात ९ चेंडूत ८ धावा केल्या. करिअरच्या सुरुवातीला रोहितच्या सातत्यावर नेहमी प्रश्नचिन्ह उपस्थित केले गेले. त्यानंतर सुरेश रैनाच्या नेतृत्वाखाली भारताचा संघ झिम्बाब्वे दौऱ्यावर गेला होता. या दौऱ्यात सचिन तेंडुलकर, युवराज सिंग, एम एस धोनी, जहीर खान या दिग्गज खेळाडूंना विश्रांती देण्यात आली होती. येथे रोहितला चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करण्याची संधी मिळाली आणि त्याने वनडे करिअरमधील पहिले शतक झळकावले. पण या सामन्यात भारताचा पराभव झाला. पदार्पण केल्यानंतर रोहितने ३ वर्षांनी पहिले शतक पूर्ण केले. वाचा- झिम्बाब्वेविरुद्धच्या या दौऱ्यात झालेल्या वनडे मालिकेत श्रीलंका हा तिसरा देश होता. रोहितने श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात शतकी खेळी केली. त्याने नाबाद १०१ धावा केल्या आणि भारताने विजय मिळवला. त्यानंतर २०११ मध्ये रोहितच्या करिअरमध्ये एक महत्त्वाचा टप्पा आला. धोनीने रोहितला सलामीवीर म्हणून पाठवण्याचा निर्णय घेतला. सलामीवीर म्हणून पहिल्या वनडेत त्याने फक्त २३ धावा केल्या. पण त्यानंतर रोहितला कोणी रोखू शकले नाही. वाचा- रोहितने आतापर्यंत वनडेत २९ शतक केली आहेत. त्यापैकी २७ सलामीला आल्यावर आहेत. तर ४२ अर्धशतकांपैकी ३७ पहिल्या क्रमांकावर आल्यावर केली आहेत. सध्या रोहित भारताचा वनडे, टी-२० आणि कसोटी अशा तिनही प्रकारातील सलामीचा फलंदाज आहे. वाचा- हिटमॅन शतक केल्यानंतर आणखी आक्रमक होतो. वनडे क्रिकेटमध्ये ३ द्विशतक करणारा तो एकमेव खेळाडू आहे. वनडेतील २६४ ही सर्वोच्च धावसंख्या त्याच्याच नावावर आहे. याशिवाय गेल्या वर्षी झालेल्या आयसीसी वर्ल्ड कपमध्ये पाच शतक त्याने केली. हा एक वर्ल्ड रेकॉर्ड आहे. वनडेत २९ शतक करणाऱ्या रोहितने टी-२० चार आणि कसोटीत ६ शतकं केली आहेत.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/2YpAfi9
No comments:
Post a Comment