नवी दिल्ली: पूर्व लडाखच्या गलवान खोऱ्या सोमवारी चीनच्या लष्करासोबत झालेल्या धुमश्चक्रीत २० भारतीय जवान शहीद झाले तर चीनचे ४३ सैनिक जखमी झालेत. या झटापटीत १७ भारतीय जवान शहीद झाल्याचे लष्कराने रात्री उशिरा सांगितले. या घटनेवर संपूर्ण देशातून तीव्र प्रतिक्रिया येत आहेत. भारतीय खेळाडूंनी देखील शहीद जवानांना श्रद्धांजली वाहिली आहे. भारतीय क्रिकेट संघातील माजी सलामीवीर ने शहीद जवानांना श्रद्धांजली वाहत चीनला सुधरण्याचा सल्ला दिला. (India China Border Dispute) यांच्यात ६ जून रोजी झालेल्या करारानुसार गलवान खोऱ्यातून सैनिकांना माघारी बोलावण्याची प्रक्रिया सुरू होती. भारतीय सैन्याची एक तुकडी जेव्हा नियंत्रण रेषेवरील चीनच्या सैन्याची परिस्थिती जाणून घेण्यासाठी पोहोचले तेव्हा दोन्ही सैन्यांमध्ये झटापट झाली आणि त्यात २० भारतीय जवानांना प्राण गमवावे लागले. सुरुवातीला एका कमांडिंग ऑफिसरसह दोन जवान शहीद झाल्याचं वृत्त धडकलं होतं. पण त्याची पृष्टी लष्करानं केली नव्हती. रात्री उशिरा लष्कराने अधिकृत माहिती देताना या झटापटीत २० जवान शहीद झाले असून १७ जवान शहीद झाल्याचं स्पष्ट केलं होतं. २० जवानांचे शहीद होणे वेदना देणारे, जवानांना श्रद्धांजली- बजरंग पुनिया शहीदांना सलाम, या जवानांच्या कुटुंबीयांचा विचार करून मन उदास- सायना नेहवाल आपल्या जवानांचे बलिदान सर्वोच्च, नेहमी ऋणी- मोहम्मद कैफ आशा आहे की चीन सुधारेल- विरेंद्र सेहवाग देश तुमचे बलिदान कधीच विसरणार नाही- शिखर धवन मन व्यथित झाले- योगेश्वर दत्त शहीद जवानांच्या बलिदानासाठी ऋणी- इरफान पठाण भारतीय क्रीडा क्षेत्रातील अनेक खेळाडूंनी चीनकडून झालेल्या या कुरापतीवर राग आणि नाराजी व्यक्त केली आहे.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/2URfGJe
No comments:
Post a Comment