नवी दिल्ली: भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्र सिंह धोनीच्या जीवनावर आधारीत चित्रपटात धोनीची भूमिका केलेल्या सुशांत सिंह रजपूतने काल आत्महत्या केली. सुशांतच्या या निर्णयाने सर्वांनाच धक्काबसला असून अनेक जण त्याच्या जुन्या आठवणींना उजाळा देत आहेत. वाचा- भारतीय क्रिकेटला बदलून टाकणाऱ्या धोनीच्या जीवनावरील चित्रपटातील भूमिकेमुळे सुशांतला यशोशिखरावर पोहोचवले होते. २०१६ साली प्रदर्शित झालेल्या चित्रपटात सुशांतने मारलेल्या हेलिकॉप्टर शॉटचा चाहता तर देखील झाला होता. आपल्यावरील बायोपिकच्या प्रदर्शनाच्या आधी एका पत्रकार परिषदेत धोनीने सुशांतच्या हेलिकॉप्टर शॉटचे कौतुक केले होते. सुशांत अगदी माझ्यासारखा खेळतो. त्याचा हेलिकॉप्टर शॉट तर माझ्याहून चांगला आहे. चित्रपटासाठी त्याने सरावादरम्यान माझ्याहून चांगला शॉट खेळला, असे धोनी म्हणाला होता. फक्त चाहत्यामध्ये नाही तर बॉक्स ऑफिसवर हिट ठरलेल्या धोनीच्या या चित्रपटातील सुशांतची भूमिका सर्वांना आवडली होती. धोनीची व्यक्तीरेखा सुशांतने अगदी उत्तमरित्या साकारली. धोनीबद्दल सुशांत म्हणाला... भारतीय संघात येण्याआधी मला धोनी आवडत होता. कधी वाटले नव्हते की बिहार-झारखंडचा मुलगा भारतीय संघाकडून खेळले. मी २००४ साली पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात धोनीला खेळताना पाहिले होते. मोठे केस ठेवणाऱ्या धोनीमध्ये वेगळा आत्मविश्वास होता. त्यानंतर २००६-०७ साली धोनीला पहिल्यांदा भेटण्याची संधी मिळाली. पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यानंतर मी धोनी सोबत फोटो काढला होता. मी तेंडुलकर आणि सेहवाग यांचा देखील चाहता आहे. पण धोनी सर्वात आवडता खेळाडू असून त्याने छोट्या शहरातील युवकांना स्वप्न पूर्ण करण्याची ताकद दिल्याचे, सुशांत म्हणाला होता. धोनी सोबतच्या चर्चा कधीच विसणार नाही " 'एमएस धोनी द अनटॉल्ड स्टोरी' हा सिनेमा करण्यापूर्वी माझ्या आणि धोनीमध्ये तीन बैठका झाल्या होत्या. या तीन बैठकांमध्ये मला धोनी हा व्यक्ती म्हणून नेमका कसा आहे, हे समजून घ्यायला फार मोठी मदत झाली होती. आमच्या पहिल्या भेटीमध्ये धोनी त्याच्याविषयी फक्त बोलत होता. त्यावेळी मी फक्त ऐकून घ्यायचे काम करत होतो. कारण मला त्याच्याबद्दलची सर्व माहिती हवी होती. आमच्या दुसऱ्या भेटीमध्ये मला काही प्रश्न पडले होते, ते मी धोनीला विचारत होतो आणि धोनी मला त्या प्रश्नांची उत्तरे देत होता. त्यानंतर झालेल्या तिसऱ्या बैठकीमध्ये तर मला धोनीबाबतच्या जवळपास सर्वच गोष्टींचा उलगडा झाला होता. त्यामुळे धोनीबरोबरच्या या तीन बैठका मी कधीही विसरू शकणार नाही."
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3fmN0j5
No comments:
Post a Comment