Ads

Friday, June 12, 2020

जगातील सर्वात वयस्कर माजी क्रिकेटपटू वसंत रायजींचे निधन!

मुंबई: प्रथम श्रेणी क्रिकेटमधील भारतातील सर्वात वयस्कर माजी क्रिकेटपटू यांनी शनिवारी निधन झाले. २६ जानेवारी रोजी रायजी यांनी शंभरावा वाढदिवस साजरा केला होता. मध्यरात्री २.२० वाजता रायजी यांचे निधन झाल्याचे त्यांचा जावई तुषार यांनी सांगितले. रायजी यांच्या पश्चात पत्नी पन्ना रायजी (वय-९५) आणि दोन मुली आहेत. रायजी यांनी मुंबईकडून १९४०च्या दशकात ९ प्रथम श्रेणी सामने खेळले. त्यात त्यांनी २७७ धावा केल्या. ६८ ही त्यांची सर्वोच्च धावसंख्या होती. रायजी १३ वर्षांचे असताना भारताने मुंबईतील बॉम्बे जिमखाना येथे पहिला कसोटी सामना खेळला होता. या सामन्याचे ते साक्षीदार होते. त्यांनी मुंबई आणि वडोदरा संघाचे प्रतिनिधित्व केले होते. १९४१ मध्ये हिंदूंच्या संघात राखीव खेळाडू म्हणून रायजी यांचा समावेश होता. १९४४-४५ साली बडोदा संघाने महाराष्ट्रवर मिळवलेल्या विजयी सामन्यात राजजी यांनी ६८ आणि ५३ अशी सर्वोच्च धावसंख्या केली होती. रायजी यांचा बंधू मदन हे देखील बॉम्ब संघाकडून खेळले होते. वाचा- लाला अमरनाथ, विजय मर्चंट, सीके नायडू आणि विजय हजारे यांना खेळताना पाहतच रायजी मोठे झाले. रायजी यांची क्रिकेटची कारकीर्द फार मोठी नव्हती पण त्यांना लेखनाची प्रचंड आवड होती. ती आवड सचोटीने जोपासत त्यांनी जवळपास ३०० पुस्तके लिहिली. ही पुस्तके त्यांनी जपून ठेवली आहेत. रायजी यांचा १००वा वाढदिवसाला दस्तुरखुद्द मास्टर ब्लास्टर आणि ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार स्टीव वॉ यांनी त्यांची भेट घेऊन शुभेच्छा दिल्या होत्या.यावेळी या दोघांनी रायजी यांच्यासाठी खास केक नेला होता. सचिनच्या आधी सुनिल गावसकर यांनी देखील रायजी यांची भेट घेऊन जुन्या आठवणींना उजाळा दिला होता.


from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/2zqvQSe

No comments:

Post a Comment

BJP’s Rajya Sabha strength falls below 100; may rise soon

A month after touching the mark of 100 seats for the first time in Rajya Sabha, BJP’s numerical strength has come down to 95 as five of its ...