नवी दिल्ली: मोठी वाट पाहिल्यानंतर आयपीएलच्या १३व्या हंगामाला शनिवारी सुरूवात झाली. भारतीय खेळाडू एका मोठा ब्रेकनंतर मैदानावर उतरले. विरुद्ध () यांच्यात झालेल्या लढतीत चेन्नईने बाजी मारली. या सामन्यात चेन्नईला संकटातून बाहेर काढले ते () ने, त्याने ४८ चेंडूत ७१ धावा केल्या. वाचा- मुंबईने दिलेल्या १६३ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना रायडूने सुरुवातीला संयमी फलंदाजी केली. त्याने ३ षटकार आणि ६ चौकार मारले. डुप्लेसिससह त्याने तिसऱ्या विकेटसाठी ११५ धावांची महत्त्वाची भागिदारी केली. ही भागिदारी चेन्नईच्या विजयाचा पाया ठरली. वाचा- रायडू जवळपास १० महिन्यांनी म्हणजे ३०७ दिवसांनी मैदानावर परतला होता. त्याने याआधी अखेरचा सामना सैयद मुश्ताक अली टी-२० ट्रॉफीत खेळला होता. हैदारबात आणि छत्तीसगड यांच्यात १७ नोव्हेंबर २०१९ रोजी हा सामना झाला होता. वाचा- चेन्नईच्या विजयानंतर रायडू म्हणाला, मी लॉकडाउनच्या काळात सराव केला होता. उत्सुकता वाढवणारी सुरूवात होती. जेव्हा दव पडण्यास सुरूवात झाली, तेव्हा फलंदाजी थोडी सोपी झाली. या हंगामासाठी आम्ही चेन्नई आणि दुबईत जोरदार सराव केल्याचे तो म्हणाला.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/35RVai0
No comments:
Post a Comment