प्रिटोरिया: दक्षिण आफ्रिकेत १७ जानेवारीपासून सुरू होणाऱ्या १९ वर्षाखालील आयसीसी वर्ल्ड कपच्या आधी भारताच्या संघाने धडाकेबाज विजय मिळवला आहे. वर्ल्ड कपच्या आधी झालेल्या सराव सामन्यात टीम इंडियाने अफगाणिस्तानवर २११ धावांनी मात केली. स्पर्धेत भारताचा पहिला सामना १९ जानेवारी रोजी श्रीलंकेविरुद्ध होणार आहे. भारतीय संघाने प्रथम फलंदाजीकरत २५५ धावा केल्या होत्या. त्यानंतर गोलंदाजाने शानदार कामगिरी करत अफगाणिस्तानचा डाव केवळ ४४ धावांवर संपुष्ठात आणला. भारताकडून त्यागीने १० धावात तीन, शुभांग हेगडे, आकाश सिंह आणि सुशांत मिश्रा यांनी प्रत्येकी दोन विकेट घेतल्या. अफगाणिस्तानचा संघ १७.५ षटकात केवळ ४४ धावा करून बाद झाला. वाचा- अफगाणिस्तानकडून मोहम्मद इशाकला फक्त दुहेरी धावसंख्या करता आली. त्याने ११ धावा केल्या. त्याआधी यशस्वी जयसवाल (६५), तिलक वर्मा (५५) यांच्या अर्धशतकाच्या जोरावर भारताने ८ बाद २५५ धावा केल्या. भारताला पहिल्याच षटकात धक्का बसला होता. दिव्यांश सक्सेना शून्यावर बाद झाला. त्यानंतर जयसवाल आणि वर्मा यांनी दुसऱ्या विकेटसाठी १२१ धावांची भागिदारी केली. जयसवालने ९७ चेंडूत ६ चौकार आणि एक षटकार मारत ६५ धावा केल्या. तर वर्माने ८४ चेंडूत ४ चौकार आणि १ षटकारासह ५५ धावा केल्या. त्यानंतर कर्णधार प्रियम गर्गने ३६ तर हेगडेने २५ धावांची खेळी केली. वाचा- मुख्य स्पर्धेतील भारताचे सामने भारत विरुद्ध श्रीलंका- १९ जानेवारी भारत विरुद्ध जपान- २१ जानेवारी भारत विरुद्ध न्यूझीलंड- २३ जानेवारी वाचा-
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/2NlvyzL
No comments:
Post a Comment